Women's T20 WC 2024 IND VS AUS : आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कप 2024 सध्या यूएईमध्ये खेळवला जात असून रविवारी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात ग्रुप स्टेजचा सामना पार पडला. हा टीम इंडियाचा शेवटचा ग्रुप स्टेज सामना होता. मात्र यात त्यांना ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला. ऑस्ट्रेलियाने भारतावर 9 धावांनी विजय मिळवला. या पराभवामुळे टीम इंडियाचं सेमी फायनलमध्ये जाण अवघड झालं असून आता त्यांना सेमीफायनलसाठी पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड या सामान्याच्या निर्णयावर अवलंबून राहावं लागणार आहे.
सहावेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरलेल्या ऑस्ट्रेलियाने भारताला हरवून सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. यावेळी भारताची कर्णधार हरमनप्रीतने नाबाद 54 धावा केल्या पण विजयासाठी कमी धावा शिल्लक असतानाही लक्ष पूर्ण करू शकले नाहीत. हरमनप्रीत पराभवानंतर नाराज दिसली. तिने पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये बोलताना म्हंटले की, 'मला वाटतं ऑस्ट्रेलियाच्या संपूर्ण टीमने योगदान दिलं, ते कोणत्याही एक किंवा दोन खेळाडूंवर अवलंबून नव्हते. त्यांच्याकडे अनेक ऑलराउंडर आहेत ज्यांनी टीमसाठी योगदान दिलं. आम्ही चांगली योजना बनवली होती आम्ही शेवटपर्यंत लढलो. पण त्यांनी आम्हाला सहज धावा करू दिल्या नाहीत आणि त्यामुळे आमच्या विजयाचा मार्ग अवघड झाला.
हरमनप्रीत कौरने राधा यादवचं कौतुक केलं. ती म्हणाली, 'राधाने खूप चांगली गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण केले. हे लक्ष्य आम्ही गाठू शकत होतो, आमच्या हातात जे होते ते आम्ही प्रयत्न केले, पण गोष्टी तुमच्या नियंत्रणा बाहेर असतात'. ऑस्ट्रेलियाच्या तहलिया मैकग्राने म्हंटले की, ' आम्हाला प्रत्येक सामना जिंकायचा होता. भारताने चांगली टक्कर दिली, पण आमच्या खेळाडूंनी चांगले प्रदर्शन केले आणि आम्हाला याचा गर्व आहे. आज प्रत्येक खेळाडूने आपले काम केले. या विकेटवर चांगली धावसंख्या काय असू शकते यावर आम्ही सतत बोलत होतो. आमच्या फलंदाजीत सखोलता आहे आणि आम्ही पूर्ण स्वातंत्र्याने खेळू शकतो हे आम्हाला माहीत होते'.
हेही वाचा : Video : क्रीजच्या एकाच बाजूला उभे होते हार्दिक आणि रियान, तरीही Run Out करून शकले नाहीत बांगलादेशचे फिल्डर
ताहिला मॅकग्रा (कर्णधार), बेथ मूनी (विकेटकीपर), ग्रेस हॅरिस, एलिस पेरी, ऍशले गार्डनर, फोबी लिचफील्ड, जॉर्जिया वेरेहॅम, ॲनाबेल सदरलँड, सोफी मोलिनक्स, मेगन शुट आणि डार्सी ब्राउन.
हरमनप्रीत कौर (कर्णधार), शफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, श्रेयांका पाटील, आशा शोभना आणि रेणुका ठाकूर सिंग.
|
AUS
(20 ov) 186/6
|
VS |
IND
188/5(18.3 ov)
|
| India beat Australia by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(49.5 ov) 271
|
VS |
USA
273/6(49 ov)
|
| USA beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
IND
(18.4 ov) 125
|
VS |
AUS
126/6(13.2 ov)
|
| Australia beat India by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.