Delhi Capitals: आयपीएलच्या 16 व्या हंगामाला (IPL 2023) आता दणक्यात सुरूवात झाली आहे. सुरूवातीच्या सामन्यांसाठी सर्व संघांनी जोर लगावला आहे. मात्र, पहिल्या काही सामन्यांमध्ये दिल्लीची तयारी फिकी पडत असल्याचं दिसतंय. पहिल्या पाचही सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) पराभव झालाय. अशातच आयपीएल 2023 मध्ये सर्वात वाईट स्थितीत असलेल्या दिल्ली कॅपिटल्सशी संबंधित एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीच्या खेळाडूंच्या किट बॅगमधून 16 बॅट, पॅड्स, थाय पॅड्स, बूट आणि ग्लोव्ह्ज गायब झाल्याची माहिती मिळाली आहे. बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धचा सामना खेळल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचे खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये (Dressing Room) पोहोचले, त्यावेळी सामना गायब असल्याचं लक्षात आलंय. त्यामुळे एकच खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. 


प्रत्येकाच्या किट बॅगमधून काही ना काही वस्तू गायब (Cricket Equipment Worth Lakhs Stolen) असल्याचं ऐकून सर्वांनाच धक्का बसला. अशी घटना पहिल्यांदाच घडली असून लवकरच हे प्रकरण लॉजिस्टिक विभाग, पोलिस आणि नंतर विमानतळ प्राधिकरणाकडे नेण्यात आलं. या प्रकरणावर तपास चालू आहे, अशी माहिती दिल्ली कॅपिटल्सकडून मिळाली आहे.


आणखी वाचा - SRH vs MI: बाबांनी कोणता सल्ला दिला? सचिनवर बोलताना अर्जुन तेंडुलकर म्हणतो...


दरम्यान, काही विदेशी खेळाडूंची बॅट गायब (Cricket Bats Stolen) झाल्याने खेळाडूंच्या अडचणी वाढल्या आहेत. काही विदेशी कंपन्यांकडून बॅट मागल्या आल्या आहेत. खेळाडू मैदान येण्यापूर्वीच त्यांचं सामान लॉजिस्टिक कंपनीकडून (logistics company) पोहचवलं जातं. याच वेळी किट बॅगमधून सामान गायब झाल्याची माहिती मिळाली आहे.


दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सचा आगामी सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होणार आहे. 20 एप्रिल रोजी दिल्लीच्या अरूण जेठली स्टेडियमवर हा सामना खेळवला जाईल. शनिवारी होणाऱ्या डबल हेडरमध्ये हा दुसरा सामना खेळवला जाणार आहे. केकेआरचा संघ सध्या फॉर्मध्ये असल्याचं दिसतंय. त्यामुळे आता दिल्लीचा वरचढ ठरणार का? असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय.