SRH vs MI: बाबांनी कोणता सल्ला दिला? सचिनवर बोलताना अर्जुन तेंडुलकर म्हणतो...

SRH vs MI Highlights: सामना जिंकल्यानंतर अर्जुनला सचिन तेंडूलकरवर (Sachin Tendulka) प्रश्न विचारण्यात आला. आम्ही खेळाआधी डावपेचांवर चर्चा करतो आणि ते मला प्रत्येक खेळाचा सराव करण्यास सांगतो, असं अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) डॅड सचिनवर बोलताना म्हणाला आहे.

Updated: Apr 19, 2023, 10:34 AM IST
SRH vs MI: बाबांनी कोणता सल्ला दिला? सचिनवर बोलताना अर्जुन तेंडुलकर म्हणतो... title=
Arjun Tendulkar, Sachin Tendulkar, Mumbai Indians

Arjun Tendulkar On Sachin Tendulkar: मुंबईने इंडियन्सने (Mumbai Indian) हैदराबादविरुद्ध दणक्यात विजय नोंदवला. मुंबईने दिलेलं 193 धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी आलेल्या सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) संघ 178 धावा करू शकला आणि 19.5 षटकात ऑलआऊट झाला. त्यामुळे मुंबईचा 14 धावांनी दणदणीत विजय मिळवला. कॅमेरून ग्रीन (Cameron Green) आणि टिळक वर्मा यांच्या मोलाची खेळी केली. त्यामुळे मुंबईच्या खात्यात दोन अंक जोडले गेले आहेत. 

आजच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) अर्जुन तेंडुलकरवर (Arjun Tendulkar) विश्वास दाखवत सामन्याचं शेवटचं षटक दिलं. अर्जुनने कर्णधाराच्या विश्वासाची लाज राखत अखेरच्या ओव्हरमध्ये 20 धावा वाचवल्या आणि संघाला विजय मिळवून दिला. आयपीएलमधली (Arjun Tendulkar first IPL Wicket) पहिली विकेटही घेतली. त्यानंतर अर्जुनने त्याची योजना सांगितली.

काय म्हणाला Arjun Tendulkar?

माझ्या हातात फक्त योजना आखणं आणि त्याची अंमलबजावणी करणं आहे, मला यावर लक्ष केंद्रित करायचं होतं. आमची योजना फक्त वाइड बॉलिंग करायची आणि लाँग बाऊंड्री असल्याने काम सोपं होतं. मला गोलंदाजी आवडते, कर्णधाराने मला केव्हाही गोलंदाजी करण्यास सांगितलं तरी मी करेल आणि फक्त संघाच्या योजनेला चिकटून राहून माझं सर्वोत्तम द्यायला मी आनंदी आहे, असं अर्जुन तेंडूलकर म्हणाला आहे.

पाहा ट्विट - 

सामना जिंकल्यानंतर त्याला सचिन तेंडूलकरवर प्रश्न विचारण्यात आला. आम्ही खेळाआधी डावपेचांवर चर्चा करतो आणि ते मला प्रत्येक खेळाचा सराव करण्यास सांगतो, असं अर्जुन तेंडुलकर डॅड सचिनवर बोलताना म्हणाला आहे. चांगली लेंथ बॉल आणि लाईन्स अपफ्रंट गोलंदाजी केली. जर तो स्विंग झाला तर तो एक बोनस आहे, जर नाही झाला, तर लाईन लेंथने गोलंदाजी करावी, असं म्हणत त्याने यशाचा मंत्र सांगितला.