Team India Vice Captain: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात खेळल्या जात असलेल्या सिरीजमध्ये भारतीय गोलंदाजींनी भन्नाट कामगिरी केली खासकरून टीम इंडियाच्या फिरकीपटूंनी. रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि आर आश्विनची कामगिरी उल्लेखनीय होती. मात्र, आगामी सामन्यासाठी के एल राहूल (KL Rahul) याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी असणार नाही. त्यामुळे आता टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय. त्यावर आता टीम इंडियाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंहने (Harbhajan Singh) मोठं वक्तव्य केलंय.


काय म्हणाला Harbhajan Singh?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय संघाकडे सध्या उपकर्णधार (vice-captain) पदावर कोणीही नाहीये. नवीन उपकर्णधार कोण असेल?, असा सवाल विचारल्यावर भज्जी म्हणतो.. "मला वाटतं एक असा खेळाडू कर्णधार किंवा उपकर्णधार पाहिजे, जो प्लेइंग इलेव्हनमध्ये निश्चितपणे राहिला पाहिजे. सामना भारतात असो किंवा विदेशात. माझ्या मते रविंद्र जडेजा असाच खेळाडू आहे." उपकर्णधारपद (vice-captain) जडेजाकडे दिलं पाहिजे, असं मत देखील जडेजाने नोंदवलं आहे.


जडेजापेक्षा (Ravindra Jadeja) चांगला ऑलराऊंडर खेळाडू जगात कुठंही नाही, असं मला वाटतंय. बेन स्टोक्स (Ben Stokes) एक मॅच विनर खेळाडू आहे. प्रत्येक सामन्यात मोठी खेळी करू शकतो, असंही जडेजाने म्हटलं आहे.


आणखी वाचा - Ravindra Jadeja: टीम इंडियाची जर्सी घातल्यावर कसं वाटतंय? जडेजा भावूक होऊन म्हणाला...


Ravindra Jadeja चं जोरदार कमबॅक 


टीम इंडियाचा (Team India) ऑलराऊंडर खेळाडू रविंद्र जडेजा याने (Ravindra Jadeja) ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या टेस्ट सिरीजमध्ये (IND vs AUS test Series) कमबॅक केलं. पाच महिन्यानंतर जडेजाने संघात एन्ट्री केली आहे.


CSK ची जबाबदारी झेपली नाही -


आयपीएल 2022 (IPL 2022) च्या हंगामात चेन्नई सूपर किंग्ज रवींद्र जाडेजाच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरली होती. मात्र जाडेजाच्या नेतृत्वाखाली चेन्नई  (Chennai Super king) खास कामगिरी करू शकली नाही. त्यामुळे त्याच्याकडे जबाबदारी देणं कितपत योग्य आहे, असा सवाल आता नेटकरी करत आहेत.