Mohammed Shami ने खतरनाक कमबॅक कसं केलं? फार्महाऊसवर नेमकं काय करायचा? सांगितला किस्सा!
Mohammed Shami World Cup 2023 : तीन वर्ल्ड कप खेळणाऱ्या शमीचा माऱ्याचा वेग कमी झाला नाही. पण शमीला हे कसं काय जमतं? शमीने एवढा खतरनाक कमबॅक कसा काय केला? असा सवाल विचारला जातोय.
Indian National Cricket Team : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात झालेल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा तब्बल 20 वर्षांनंतर वर्ल्ड कपमध्ये (World Cup 2023) पराभव केलाय. टीम इंडियाच्या विजयात फास्टर मोहम्मद शमीचा (Mohammed Shami) मोलाचा वाटा राहिला. शमीने 5 गडी तंबुत पाठवले अन् न्यूझीलंडच्या स्कोरबोर्डला ब्रेक लावला. दुसऱ्या स्पेलमध्ये शमीने किवींच्या खालच्या फळीतील फलंदाजांच्या विकेट्स खोलल्या. शमीच्या गोलंदाजीमध्ये एक वेगळ्या प्रकारची लय दिसत होती. तीन वर्ल्ड कप खेळणाऱ्या शमीचा माऱ्याचा वेग कमी झाला नाही. पण शमीला हे कसं काय जमतं? शमीने एवढा खतरनाक कमबॅक कसा काय केला? असा सवाल विचारला जात आहे. त्याचं उत्तर शमीने प्रेस कॉन्फरेन्समध्ये दिलं आहे.
एखादा सामना खेळल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती थकवा घालवणं. क्रिकेटच्या सामन्यांमध्ये आम्हाला ब्रेक मिळतो. त्यावेळी आम्हाला आमच्या खेळात सुधारणा करण्याची गरज असते. त्यामुळे आम्ही क्रिकेटपासून लांब राहू शकत नाही. आमचं काम चालूच असतं. त्यामुळे आम्हाला कधीही सुट्टी नसते, असं शमी म्हणतो. कोरोनाच्या वेळेत मी फार्महाऊसवर काही सोईसुविधा तयार केल्या होत्या. त्याचा मला फायदा झाला. माझ्या लहान भावासाठी मी काही प्रशिक्षण सुविधा तयार केल्या होत्या. त्याचा मला फायदा झाला. मी दररोज सराव करत होतो. मला माझ्या गोलंदाजीमध्ये सुधारणा केली होती, असं मोहम्मद शमीने सांगितलं.
टीम इंडिया चांगली कामगिरी करत असेल तर बाहेर बसणं जास्त कठीण नसतं. जेव्हा तुमचे सहकारी चांगला खेळत असतील, तेव्हा तुम्ही त्यांना साथ दिली पाहिजे. जर मी बाहेर असणं जर हे टीमच्या हिताचं असेल तर मला त्यात कोणतीही अडचण नाही, असंही शमीने (Mohammed Shami) सांगितलंय. त्यावेळी शमीने टीम इंडियाच्या आधीच्या कामगिरीचं कौतूक देखील केलंय. टीम इंडियाच्या खेळाडूंनी आत्तापर्यंत चांगली कामगिरी केलीये.
दरम्यान, मोहम्मद शमीला आत्तापर्यंत टीम इंडियामध्ये संधी मिळाली नव्हती. बुमराह आणि सिराज यांनी टीम इंडियामध्ये जागा कायम ठेवली होती. हार्दिक पांड्या जखमी झाल्याने टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल झाला. सूर्यकुमार आणि शमीची संघात एन्ट्री झाली होती. तर हार्दिक आणि इशान किशन यांना आराम देण्यात आला होता.