ICC World Cup 2023: आयसीसीकडून आयोजित केल्या जाणाऱ्या वनडे वर्ल्ड कपचं यजमानपद यंदा भारताकडे देण्यात आलंय. त्यामुळे यंदाच्या वर्षी भारतात वनडे वर्ल्ड कप (World Cup 2023) खेळवला जाणार आहे. त्यामुळे भारतीयांची उत्सुकता शिगेला पोहोचल्याचं दिसतंय. या वर्ल्ड कपमध्ये 3 नॉकआऊट सामन्यांसोबत एकूण 48 सामने खेळवले जाणार आहेत. त्यामुळे आता टीम इंडियामध्ये (Team India) कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अशातच आता मोठी बातमी समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताच्या एकूण 12 शहरांमध्ये सर्व सामने खेळवले जाणार असून यामध्ये हैदराबाद, कोलकाता, लखनऊ, इंदूर, दिल्ली, लखनऊ, चेन्नई, बंगळूरू, धर्मशाला, गुवाहाटी, राजकोट आणि मुंबई या शहरांचा समावेश आहे. 18 जूनला विश्वचषक पात्रता फेरीची (World Cup Qualifiers) सुरुवात होणार आहे. अशातच आता या सामन्यांसाठी स्कॉटलँडने (Scotland World Cup Team) आपला संघ जाहीर केला आहे.


यजमान भारताला वर्ल्ड कपमध्ये थेट प्रवेश मिळालाय. त्याचबरोबर न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका या संघांनीही 2023 च्या वर्ल्ड कपसाठी पात्रता मिळवली आहे. मात्र, इतर संघांना क्वालिफायर सामने खेळावे लागतील. क्वालिफायर खेळणाऱ्या दोन संघांना वर्ल्ड कप स्पर्धेत स्थान मिळणार आहे. अशा स्थितीत पात्रता फेरीत खेळण्यासाठी 18 जूनपासून सुरूवात होईल. त्यामुळे आता स्कॉटलँडचा संघ जोरदार तयारी करताना दिसतोय.


आणखी वाचा - MS Dhoni खोटं बोलला? पुरावा सादर करत Kevin Pietersen चं सडेतोड प्रत्युत्तर, म्हणाला... पाहा Video


दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून टीम इंडियाला दुखापतीचं ग्रहण लागलंय. जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर, के एल राहूल अशा बड्या खेळाडूंची नावं यामध्ये आहेत. त्यामुळे आता रोहित शर्माचं टेन्शन वाढलंय. त्यामुळे आता वर्ल्ड कपसाठी कोणाला संधी मिळणार? युवा खेळाडूंना संघात स्थान मिळणार की नाही? अशी चर्चा आता सुरू झालीये.


World Cup 2023 साठी स्कॉटलँडचा संघ  


रिची बेरिंग्टन (c), मॅथ्यू क्रॉस, अलास्डेअर इव्हान्स, ख्रिस ग्रीव्हज, जॅक जार्विस, मायकेल लीस्क, ब्रँडन मॅकमुलन, टॉम मॅकइंटॉश, ख्रिस मॅकब्राइड, जॉर्ज मुन्से, एड्रियन नील, सफियान शरीफ, ख्रिस सॉले, हमजा ताहिर, मार्क वॉट.