IPL 2023: RCB च्या ताफ्यात `तो` पुन्हा आलाय, Virat Kohli चं टेन्शन संपलं!
IPL 2023, RCB: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) संघासाठी मोठी बातमी समोर आली आहे. विराटचा आनंद देखील गगनात मावेना झालाय.
IPL 2023: इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या हंगाचे वेळापत्रक (IPL 2023 Match Schedule) जाहीर करण्यात आलं आहे. 31 मार्चपासून सुरू होणाऱ्या या सिझनचा (IPL 2023) पहिला सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (GT vs CSK) यांच्यात होणार आहे. त्यामुळे आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशातच आता आयसीबीच्या (RCB) फॅन्सचा उत्साह आता डबल झाला आहे. त्यामुळे विराट (Virat Kohli) देखील आनंदाने नाचू लागला आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) संघासाठी मोठी बातमी समोर आली आहे. विराटचा आनंद देखील गगनात मावेना झालाय. कारण देखील तसंच आहे. विराटचा खास मित्र ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) पुन्हा मैदानात परतला आहे.
मॅक्सवेल इस बॅक (Glenn Maxwell)
ऑस्ट्रेलियाचा महान अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) हा मित्राच्या पार्टीत जखमी झाला होता. झल्याने त्याच्या पायाला फ्रॅक्चर झालं होतं. आता तो यातून सावरला असला तरी तो देशांतर्गत क्रिकेट खेळणार आहे. यामुळे बंगळुरूच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. जर मॅक्सवेल देशांतर्गत चांगला खेळला आणि त्याला फिटनेसची कोणतीही समस्या नसेल तर तो आगामी आयपीएलमध्ये बंगळुरू (RCB) संघासाठी खेळू शकेल.
आणखी वाचा - MS Dhoni Retirement: धोनी खेळणार शेवटचा IPL सामना? पाहा तारीख, वेळ आणि ठिकाण
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ (RCB Squad for IPL 2023)
फाफ डु प्लेसिस (C), विराट कोहली, सुयश प्रभुदेसाई, रजत पाटीदार, अनुज रावत, फिन एलन, दिनेश कार्तिक, मोहम्मद सिराज, कर्ण शर्मा, सिद्धार्थ कॉल, जोश हेजलवुड, हर्षल पटेल, आकाश दीप, ग्लेन मैक्सवेल, डेविड विली, महिपाल लोमरोर, शाहबाज अहमद, वानिन्दु हसारंगा, रीस टोप्ले, हिमांशु शर्मा, विल जैक्स, मनोज भांडगे, अविनाश सिंह, सोनू यादव, राजन कुमार
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं संपूर्ण शेड्यूल: (RCB IPL 2023 Match Schedule)
2 एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बंगलुरू vs मुंबई इंडियंस
6 एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बंगलुरू vs कोलकाता नाइट राइडर्स
10 एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बंगलुरू vs लखनऊ सुपर जायन्ट्स
15 एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बंगलुरूvs दिल्ली कैपिटल्स
17 एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बंगलुरू vs चेन्नई सुपर किंग्स
20 एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बंगलुरू vs पंजाब किंग्स
23 एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बंगलुरू vs राजस्थान रॉयल्स
26 एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बंगलुरू vs कोलकाता नाइट राइडर्स
1 मे - रॉयल चॅलेंजर्स बंगलुरू vs लखनऊ सुपर जायन्ट्स
6 मे - रॉयल चॅलेंजर्स बंगलुरू vs दिल्ली कैपिटल्स
9 मे - रॉयल चॅलेंजर्स बंगलुरू vs मुंबई इंडियंस
14 मे - रॉयल चॅलेंजर्स बंगलुरू vs राजस्थान रॉयल्स
18 मे - रॉयल चॅलेंजर्स बंगलुरू vs सनराइजर्स हैदराबाद
21 मे - रॉयल चॅलेंजर्स बंगलुरू vs गुजराट टाइटन्स