MS Dhoni Retirement : आगामी आयपीएलच्या (IPL 2023) 16 व्या हंगामात सर्वांचा लाडका धोनी (MS Dhoni) खेळणार नाही की नाही? अशी चर्चा क्रिडाविश्वात सुरू होती. IPL 2023 हे धोनीची शेवटची आयपीएल असू शकते. धोनीने अद्याप अधिकृतपणे हे जाहीर केलेलं नसलं तरी शेर अब बुढा हो गया है, याची जाणीव चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या व्यवस्थापकांना झाली आहे. एका कार्यक्रमात बोलताना चेन्नईचे अधिकारी म्हणतात...
आम्हाला विश्वास आहे की, हा त्याचा शेवटचा हंगाम असेल कारण त्याला त्याच्या आवडत्या स्टेडियमवर निरोप द्यायचा आहे. कोणत्याही परिस्थितीत, आयपीएलच्या सुरूवातीस आम्हाला स्पष्टता हवी आहे. एमएसने आम्हाला त्यांच्या निर्णयाची माहिती दिली नाही आणि तसं करण्यासाठी त्यांच्यावर कोणताही दबाव नाही, असं चेन्नईच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
बीसीसीआयने (BCCI) आगामी IPL 2023 चे वेळापत्रक जाहीर केलंय. या वेळापत्रकामुळे आता महेंद्रसिंग धोनीच्या फेअरवेल मॅचची तारीखही समोर आली आहे.
चेन्नई सुपर किंग्जचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला नाही तर धोनी आपला शेवटचा आयपीएल सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळू शकतो. अखेरचा सामना चेपॉकवर खेळायचा आहे, असे संकेत धोनीने मागील हंगामावेळी दिला होता. त्यामुळे आता सीएसके देखील त्याला निरोप देण्यासाठी तयारी करत असल्याचं दिसतंय.
चेन्नईचा संघ 14 मे रोजी चेपॉकच्या मैदानावर शेवटचा सामना खेळणार आहे. चेन्नई सुपर किंग्स vs कोलकाता नाइट राइडर्स असा सामना रंगणार आहे. जर चेन्नईचा संघ प्लेऑफमध्ये गेला तर पुढील सामने देखील धोनी खेळू शकतो.
आणखी वाचा - IPL 2023: धोनीच्या स्वप्नाचा होणारा चुराडा? आयपीएलपूर्वी माहीचा हुकमी एक्का 'आऊट'
31 मार्च चेन्नई सुपर किंग्स vs गुजरात टाइटन्स
3 एप्रिल चेन्नई सुपर किंग्स vs लखनऊ सुपर जायन्ट्स
8 एप्रिल चेन्नई सुपर किंग्स vs मुंबई इंडियंस
12 एप्रिल चेन्नई सुपर किंग्स vs राजस्थान रॉयल्स
17 एप्रिल चेन्नई सुपर किंग्स vs रॉयल चैलेंजर्स बैंगलोर
21 एप्रिल चेन्नई सुपर किंग्स vs सनराइजर्स हैदराबाद
23 एप्रिल चेन्नई सुपर किंग्स vs कोलकाता नाइट राइडर्स
27 एप्रिल चेन्नई सुपर किंग्स vs राजस्थान रॉयल्स
30 एप्रिल चेन्नई सुपर किंग्स vs पंजाब किंग्स
4 मे चेन्नई सुपर किंग्स vs लखनऊ सुपर जायन्ट्स
6 मे चेन्नई सुपर किंग्स vs मुंबई इंडियंस
10 मे चेन्नई सुपर किंग्स vs दिल्ली कैपिटल्स
14 मे चेन्नई सुपर किंग्स vs कोलकाता नाइट राइडर्स
20 मे चेन्नई सुपर किंग्स vs दिल्ली कैपिटल्स
It's everything you could ever want! #VaaThala #WhistlePodu #Yellove pic.twitter.com/P1jHVg7pal
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) February 17, 2023
आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या यशात सर्वात मोठा वाटा आहे तो कर्णधार एम एस धोनीचा. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने (CSK) तब्बल चार वेळा जेतेपद पटकावलं आहे. 2010, 2011, 2018 आणि 2021 अशा चार वेळा चेन्नईने आयपीएल स्पर्धा जिंकण्याची कमाल केली आहे. विशेष म्हणजे 2008 च्या पहिल्या हंगामापासून आतापर्यंत चेन्नई संघाचा एमएस धोणी हा एकमेव कर्णधार आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा अंतिम फेरीत पोहोचलेला चेन्नई हा एकमेव संघ आहे.