Cameron Green on Suryakumar Yadav: यंदाच्या हंगामात झालेल्या सामन्यात सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) गुजरात टायटन्सच्या कसलेल्या गोलंदाजांना टप्प्यात घेत 49 बॉलमध्ये नाबाद 103 धावा ठोकल्या होत्या. त्यानंतर आता सूर्यकुमार याचं गुजरात विरुद्ध क्वॉलिफायर (MI vs GT Qualifier 2) सामन्यात कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.  अशातच आता मुंबई इंडियन्सचा स्टार कॅमरून ग्रीन (Cameron Green) याने सूर्यकुमार यादवचं तोंडभरून कौतूक केलंय.


काय म्हणाला कॅमरून ग्रीन?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित शर्माकडे (Rohit Sharma) भारताकडून खेळण्याचा आणि आयपीएलमध्ये खेळण्याचा इतका अनुभव आहे, त्यामुळे त्याला अनेक गोष्टी माहिती आहेत. मला वाटतं की मुंबईने आयपीएलमधील पहिला सामना कधीच जिंकला नाही. मात्र, आमची सुरुवात संथ होती पण आम्ही योग्य वेळी सर्वोत्तम कामगिरी करत आहोत. हे सर्वात महत्वाचे आहे, असं कॅमरून ग्रीन (Cameron Green on Rohit Sharma)  म्हणाला आहे. त्यावेळी त्याने सूर्यकुमार यादवच्या फलंदाजीचं कौतूक केलंय.


आणखी वाचा - IPL 2023: राशिद खानकडे इतिहास रचण्याची संधी; 'हा' मोठा रेकॉर्ड मोडणार?


सूर्यकुमार यादवसोबत फलंदाजी करणे ही जगातील सर्वांत सोपी गोष्ट आहे. सूर्यकुमार यादवला स्ट्राइक द्यावी आणि जर तुम्हाला लूज बॉल मिळाला तर त्याला तो बॉन्ड्रीपार पाठवतो, असं कॅमरून ग्रीन (Cameron Green on Suryakumar Yadav Batting)  म्हणाला आहे. सूर्यकुमार यादवच्या आजच्या कामगिरीवर आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.



दरम्यान,लखनऊ विरुद्ध मुंबई इंडियन्स (LSG vs MI) यांच्यात झालेल्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने लखनऊवर 81 धावांनी मोठा विजय नोंदवला आणि दुसऱ्या क्वालिफायरमध्ये प्रवेश मिळवला होता. त्यानंतर आता मुंबई सामना जिंकून फायनल गाठणार की गुजरात मुंबईची नौका बुडवणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.