RCB v KKR संभाव्य Playing 11 अशी असेल? मागील 5 पैकी 4 सामने गमवाणारा RCB फेव्हरेट कारण..
RCB vs KKR Playing 11 Prediction: दोन्ही संघांनी आपआपले शेवटचे सामने जिंकले असल्याने आपला विजयी कामगिरी सुरु ठेवण्याच्या उद्देशानेच दोन्ही संघ मैदानात उतरतील. कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन कशी असेल? पाहूयात...
IPL 2024 RCB vs KKR Playing 11 Prediction: इंडियन प्रिमिअर लीग म्हणजेच आयपीएलच्या 17 व्या पर्वाचा 10 सामना आज (29 मार्च, शुक्रवार) कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुदरम्यान खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांनी आपआपले शेवटचे सामने जिंकले असल्याने आपला विजयी कामगिरी सुरु ठेवण्याच्या उद्देशानेच दोन्ही संघ मैदानात उतरतील. या दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन कशी असेल? यापूर्वी हे संघ आमने-सामने आले तेव्हा काय झालं? हे पाहूयात...
दोन्ही संघांची कामगिरी कशी?
बंगळुरुच्या संघाने मागील सामन्यात पंजाब किंग्जच्या संघाविरुद्धचा सामना 4 गडी राखून जिंकला. तर कोलकात्याने सनरायढर्स हैदराबादच्या संगाला 4 धावांनी पराभूत केलं आहे. दोन्ही संघांसमोर फलंदाजीमध्ये सातत्य राखण्याचं आव्हान आहे. दोन्ही संघातील सलामीवीर आणि मधल्या फळतील खेळाडूंना लय गवसली नाही. आक्रमक खेळाडू असूनही मोठी खेळी करण्यात आणि सातत्य राखण्यात दोन्ही संघातील बड्या नावांना अपयश येत आहे. आरसीबी कोलकात्याविरुद्धच्या मागील 5 सामन्यांपैकी 4 सामने पराभूत झाली असली तरी हा सामना बंगळुरुमध्ये खेळवला जाणार असल्याने आरसीबीचे पारडे जड मानले जात आहे. मात्र त्याचवेळी स्पर्धेत पहिला विजय मिळवलेल्या श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील केकेआरच्या संघालाही आपली विजयी घौडदौड कायम राखायचा असून त्यासाठी त्यांना प्रामुख्याने गोलंदाजीमध्ये सुधारणा करावी लागणार आहे.
कोलकात्यासमोरील समस्या कोणत्या?
कोलकात्याच्या संघातील श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर तसेच नितीश राणासारखे उत्तम फटकेबाजी करणारे फलंदाज असले तरी त्यांना मागील सामन्यात हैदराबादविरुद्ध नावाला साजेशी कामगिरी करता आली नाही. या सामन्यामध्ये आंद्रे रसेल, रमणदीप सिंग आणि रिंकू सिंह या तिघांच्या फटकेबाजीमुळे कोलकात्याला विजय मिळवता आला. कर्णधार श्रेयसला संघाच्या दोन्ही सामन्यांमध्ये भोपळाही फोडता आळा नाही. विशेष म्हणजे सर्वात महागड्या खेळाडूंपैकी एक असलेल्या मिचेल स्टार्कलाही गोलंदाजीत फारसा प्रभाव पाडता आलेला नाही. त्यामुळे हे खेळाडू कसे खेळतात यावरच कोलकात्याची कामगिरी अवलंबून असेल.
नक्की वाचा >> IPL 2024 Points Table मध्ये राजस्थानचा रॉयल कारभार! मुंबईचं रँकिंग पाहून बसेल धक्का
आरसीबी विरुद्ध केकेआर मागील 5 सामन्यात काय घडलं
2023 - केकेआरचा 21 धावांनी विजय.
2023 - केकेआरचा 81 धावांनी विजय.
2022 - आरसीबीचा 3 गडी राखून विजय.
2021 - केकेआरचा 4 गडी राखून विजय
2021 - केकेआरचा 9 गडी राखून विजय
दोन्ही संघ आत्तापर्यंत 32 सामने खेळले असून त्यापैकी 18 मध्ये केकेआरने विजय मिळवला असून 14 सामने आरसीबीने जिंकले आहेत.
केकेआरचा संभाव्य संघ -
श्रेयस अय्यर (कर्णधार), फिल सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नारायण, नितीश राणा, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, व्यंकटेश अय्यर, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरूण चक्रवर्ती, सुयश शर्मा.
आरसीबीचा संभाव्य संघ -
फाफ डू प्लेसिस (कर्णधार), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, कॅमेरून ग्रीन, अनुज रावत, मोहम्मद सिराज, यश दयाल, मयंक डागर, अल्झारी जोसेफ.
नक्की पाहा >> 4, 4, 6, 4, 6, 1... शेवटच्या ओव्हरमध्ये परागची तुफान फटकेबाजी! इथेच सामना फिरला; पाहा Video
किती वाजता सुरु होणार सामना-
सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी प्रत्यक्ष खेळाला सुरुवात होईल.
कुठे होणार सामना-
बंगळुरुमधील एम. चिन्नस्वामी स्टेडियमवर रंगणार सामना
कुठे पाहता येणार सामना-
या सामन्याचं लाईव्ह प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी बरोबरच जीओ सिनेमा अॅपवर सामना लाईव्ह पाहता येईल.
केकेआरचा संपूर्ण संघ -
श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, रिंकू सिंग, रहमनुल्ला गुरबाज, फिल सॉल्ट, सुनील नारायण, सुयश शर्मा, अनुकूल रॉय, आंद्रे रसेल, व्यंकटेश अय्यर, हर्षित राणा, वैभव अरोरा, वरूण चक्रवर्ती, केएस भरत, चेतन सकारिया, मिचेल स्टार्क, अंगक्रिश रघुवंशी, रमणदीप सिंग, शेरफेन रुदरफोर्ड, मनिष पांडे, मुजीब उर रहमान, दुशमंथा चमीरा, साकिब हुसेन
आरसीबीचा संपूर्ण संघ -
फाफ डू प्लेसिस (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली, रजत पाटीदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, विल जॅक्स, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, मनोज भंडागे, मयंक डागर, विजयकुमार वैशाख, आकाशदीप, मोहम्मद सिराज, रीस टोपले, हिमांशू शर्मा, राजन कुमार, कॅमेरून ग्रीन, अल्झारी जोसेफ, यश दयाल, टॉम करन, लॉकी फर्ग्युसन, स्वप्नील सिंग, सौरव चौहान.