IPL 2024 Riyan Parag Last Over Against DC Video: इंडियन प्रिमिअर लीगच्या 9 व्या सामन्यामध्ये राजस्थान रॉयल्सने दिल्ली डेअरडेव्हल्सच्या संघाला 12 धावांनी धूळ चारली. राजस्थानमधील सवाई मानसिंग स्टेडियममध्ये गुरुवारी झालेल्या सामन्यामध्ये राजस्थानचा मधल्या फळीतील फलंदाज रियान परागने केलेल्या खेळीमुळे चर्चेत आहे. सामन्याच्या सुरुवातीलाच राजस्थानने महत्त्वाचे 3 गडी गमावल्यानंतर परागने डावाला आकार देत उत्तम फटकेबाजी केली. विशेष म्हणजे त्याने शेवटच्या ओव्हरमध्ये तब्बल 25 धावा केल्या. याच 25 धावा सामन्याच्या निकालामध्ये निर्णायक ठरल्या कारण दिल्लीने हा सामना फक्त 12 धावांनी गमावला.
नाणेफेक जिंकून ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्लीच्या संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. राजस्थानची पहिली विकेट यशस्वी जयसवालच्या रुपात संघाचा स्कोअर 9 धावा इतका होता. त्यानंतर धावसंख्या 30 वर असताना कर्णधार संजू सॅमसन तंबूत परतला. या धावसंख्येत 6 ची भर पडली आणि 36 स्कोअर असताना जॉस बटलर तंबूत परतला. त्यानंतर रियान परागने आर, अश्वीनच्या जोडीने 54 धावांची भागीदारी करत पडझड थांबवली. परागने 45 बॉलमध्ये 84 धावा केल्या. एकेवेळी राजस्थान 140 चा टप्पा गाठेल की नाही अशी शंका असताना परागच्या एकट्याच्या खेळीच्या जोरावर 185 धावांचा टप्पा गाठला. परागने यापूर्वीच्या सामन्यातही 43 धावांची खेळी केलेली. विशेष म्हणजे दिल्लीविरुद्धच्या सामन्यात शेवटच्या ओव्हरमध्ये परागने दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरीच नॉर्टीजेला दोन षटकार आणि 3 चौकार लगावले. शेवटच्या ओव्हरमध्ये परागने 4, 4, 6, 4, 6, 1 अशा धावा केल्या. परागची ही फटकेबाजी पाहून ऋषभ पंतच्या चेहऱ्यावर निराशा पाहायला मिळाली.
परागने शेवटच्या षटकामध्ये केलेल्या फटकेबाजीमुळे राजस्थानला 180 धावांचा टप्पा ओलांडता आला. परागच्या फटकेबाजीचा व्हिडीओ तुम्हीच पाहा...
1)
Come for that shot, stay for that reaction at the end #IPLonJioCinema #RRvDC #TATAIPL #JioCinemaSports pic.twitter.com/HZfniV3mgv
— JioCinema (@JioCinema) March 28, 2024
2)
— Abhi (@CoverDrive001) March 28, 2024
या धावांचा पाठलाग करताना दिल्लीकडून डेव्हीड वॉर्नर (49 धावा) आणि ट्रीस्टॅन स्टब (44 धावा) वगळता कोणत्याही खेळाडूला चांगली खेळी करता आली नाही. दिल्लीचा डाव 173 धावांवर आटोपला. शेवटच्या ओव्हरमध्ये दिल्लीला विजयासाठी 17 धावांची गरज असताना त्यांना केवळ 4 धावा करता आल्या आणि राजस्थानने हा सामना 12 धावांनी जिंकला. राजस्थानच्या या विजयामुळे ते पॉइण्ट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी पोहोचले आहेत.