मुंबई : एका मुलीसोबतचा हार्दिक पांड्याचा फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत होता. हार्दिक पांड्यासोबतच्या मुलीचं गूढ अशा बातम्या प्रसिद्ध होत होत्या. या सगळ्या प्रकरणावर खुद्द हार्दिक पांड्यानं स्पष्टीकरण दिलं आहे. गूढ उकललं ही माझी बहिण आहे, असं ट्विट हार्दिक पांड्यानं केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी हार्दिक पांड्या आणि परिणीती चोप्रा तसंच हार्दिक पांड्या आणि शिबानी दांडेकर यांच्याबाबतच्या चर्चा मोठ्याप्रमाणावर झाल्या होत्या. पण यामध्ये काहीही तथ्य नसल्याचं नंतर समोर आलं होतं.


ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच झालेल्या वनडे सीरिजमध्ये भारतानं ४-१नं विजय मिळवला. भारताच्या या विजयामध्ये हार्दिक पांड्यानं मोलाची कामगिरी केली होती. या सीरिजमध्ये हार्दिक पांड्याला मॅन ऑफ द सीरिज म्हणून गौरवण्यात आलं.