COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिडनी : राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय नेमबाज तेजस्विनी सावंतनं धवल यश मिळवलं आहे. 50 मीटर प्रोन रायफल नेमबाजीत आज तेजस्विनीनं रौप्य पदक मिळवलं आहे. त्यामुळे भारतीय पदकांच्या झोळीत आणखी एका पदकाची भर पडली आहे. भारत पदक तालिकेत तिसऱ्या स्थानी कायम आहे.


तेजस्विनीचा नेम बरोबर लागला


ऑस्ट्रेलियात राष्ट्रकुल स्पर्धेत तेजस्वीनी सावंतने आठव्या दिवशी पहिलं पदक प्राप्त केलं. ३८ वर्षाच्या तेजस्वी सावंतने महिलांच्या ५० मीटर रायफल प्रोन स्पर्धेत रौप्य पदक मिळवलं आहे. तेजस्विनी 618.9 पॉईंटसने दुसऱ्या क्रमांकावर राहिली. तर सिंगापूरच्या मार्टिना लिंडसेने रेकॉर्ड करत, 621.0 पॉईंटस मिळवले. या स्पर्धेत भारताची अंजुम मौदगिल ही सोळाव्या स्थानी राहिली, तिला 602.2 पॉईंटस मिळाले.


२ वेळेस पदक जिंकणारी भारतीय पहिली महिला खेळाडू


तेजस्विनी या स्पर्धेत २ वेळेस पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू झाली आहे. या आधी रूपा उन्नीकृष्णननने १९९८ मध्ये क्वालांलापूरमध्ये सुवर्ण पदक जिंकलं होतं. तेजस्विनीच्या विजयानंतर भारताची पदक संख्या १२ झाली आहे. यात ४ गोल्ड, ३ सिल्वर, ५ ब्रॉझ आहेत. वेटलिफ्टिंग भारताने सर्वाधिक ५ सुवर्ण आणि एकूण ९ पदक मिळवले आहेत.