Mohammed Shami On Sania Mirza Marriage: भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammed Shami) अखेर माजी टेनिसपटू सानिया मिर्झाबरोबर (Sania Mirza) त्याचं नाव जोडलं गेलेल्या प्रकरणावर थेट भाष्य केलं आहे. सोशल मीडियावरुन अनेकांनी माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकपासून घटस्फोट घेतल्यानंतर सानिया मिर्झा मोहम्मद शामीबरोबर लग्न करणार असल्याच्या अफवा व्हायरल केल्या होता. सोशल मीडियावर यासंदर्भातील अनेक एडीटेड फोटो व्हायरल झाले होते. याच सर्व गोष्टींवर शमी पहिल्यांदाच उघडपणे बोलला आहे.


शमी स्पष्टच बोलला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युट्यूबर शुभांकर मिश्राच्या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत शमीने सानिया मिर्झाबरोबर नावं जोडलं जात असणाऱ्या प्रकरणाबद्दल भाष्य केलं. 'अनप्लग्ड' नावाच्या विशेष कार्यक्रमामध्ये बोलताना शमीने अशा प्रकारच्या खोट्या बातम्या चाहत्यांनी सोशल मीडियावरुन पसरवू नयेत अशी विनंती केली आहे. अशा पद्धतीचे मिम्स हे मनोरंजक असले तरी ते घातकही ठरु शकतात अशा इशारा शमीने मॉर्फो फोटो आणि मस्करीच्या नावाखाली खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना दिला आहे. "मी सर्वांना विनंती करेन की त्यांनी सोशल मीडियावर अधिक जबाबदारपणे वागावं. अशाप्रकारच्या तथ्यहीन बातम्या पसरवू नका," असं शमी चाहत्यांना म्हणाला आहे.


काय करणार? फोन सुरु केला तर...


"हे विचित्र आहे सारं. तसं त्यात काय आहे? फोटो बनवण्यासाठी उगाच जबदस्ती केल्याचं दिसत आहे. पण काय करणार? फोन सुरु केला तर माझाचे फोटो मला दिसतात. मात्र मी एक गोष्ट बोलू इच्छितो. उगाच कोणाला तरी अशा प्रकरणांमध्ये खेचू नये. मला मान्य आहे की मिम्स तुमच्यासाठी मस्करीचा विषय आहेत. मात्र ते कोणाच्या तरी आयुष्याशी संबंधित असतात.तुम्ही फार विचार करुन मिम्स तयार केले पाहिजे. आत तुमचं व्हेरिफाइड पेज नाहीये. तुमचा कोणताही पत्ता उपलब्ध नाहीये. तुम्ही प्रसिद्ध नाही आहात तर तुम्ही असं बोलू शकता," असं शमीने सानियाबरोबरच्या व्हायरल फोटोंबद्दल नाराजी व्यक्त करताना म्हटलं. 


नक्की वाचा >> 'मी अजून काय करणं अपेक्षित आहे? मी कधीच...', कोहलीवर भडकला मोहम्मद शमी; म्हणाला, 'तुम्ही मला..'


शमीचं थेट आव्हान! म्हणाला, 'हिंमत असेल तर...'


"मी अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की, तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही व्हेरिफाइड पेजवरुन असं बोलून दाखवा. तेव्हा आम्ही सांगतो. दुसऱ्यांचा पाय खेचणं फार सोपं आहे. यश संपादन करा. आपला दर्जा वाढवा. तेव्हा मी मान्य करेल की तुम्ही चांगले आहात," असं शमीने वायफळ मिम्स बनवणाऱ्यांवर आणि खोट्या बातम्या व्हायरल करणाऱ्यांवर संताप व्यक्त करताना म्हटलं आहे.