Shehbaz Sharif Tweet On Team India Defeat: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात दुसरा सेमीफायनल सामना खेळवला गेला. या सामन्यात टीम इंडियाचा दारूण पराभव झाला. भारतीय गोलंदाजांची लाजिरवाणी कामगिरी पहायला मिळाली. भारताला इंग्लंडच्या एकाही खेळाडूला बाद करता आलं नाही. इंग्लंडने सामना 10 विकेटने जिंकला (England Beat India By 10 wickets). त्यामुळे आता क्रिडाविश्वातून टीम इंडियाला ट्रोल केलं जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताच्या पराभवानंतर सोशल मीडियावर (Team India Troll On Social Media) भारतीय आणि पाकिस्तानी भिडताना दिसत आहे. ट्विटरवर एकप्रकारे ट्विट वॉर (Twitter War) सुरू झाल्याचं दिसतंय. अशातच आता पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी (Pakistan PM Shehbaz Sharif) देखील आपली स्पर्धेत सहभाग घेत भारतीय जखमेवरची खपली काढली आहे.


काय म्हणाले शाहबाज शरीफ ?


पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनी ट्विटरवर लिहिलं की, या रविवारी 152/0 विरुद्ध 170/0 असा सामना होणार आहे. शाहबाज शरीफ यांनी या ट्विटमध्ये याशिवाय इतर कशाचाही उल्लेख केलाचं दिसत नाही, पण प्रत्यक्षात शाहबाज शरीफ यांचे हे ट्विट (Tweet) टीम इंडियाला टोमणा मारणाऱ्यासाठी होता हे सर्वांच्या लक्षात आलंय. त्याचवेळी त्यांनी पाकिस्तान आणि इंग्लंडचे झेंडे देखील शेअर केले आहे.


आणखी वाचा- Virat Kohli T20 World Cup: विराट कोहलीने रचला 'विश्वविक्रम'! अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच खेळाडू


पाहा ट्विट- 



दरम्यान, पाकिस्तानी पंतप्रधानांच्या ट्विटनंतर भारतीय नेटकऱ्यांची (Trollers) तुकडी जोरदार हल्लाबोल करताना दिसत आहे. अनेकांनी भन्नाट कमेंट करत त्यांना प्रत्युत्तर दिलंय. आम्ही पाकिस्तानला हारवलं तेव्हाच वर्ल्ड कप (T20 World Cup) जिंकला, असं प्रत्युत्तर भारतीयांनी दिलंय. तर दुसरीकडे नाव शरीफ पण काम बालिश असं कमेंट अनेकांनी केली आहे. पंतप्रधानपदावर बसलेल्या व्यक्तीने असं ट्विट करणं हे पदाला न शोभणारं आहे, असं क्रिडातज्ज्ञांनी म्हटलं.