Virat Kohli T20 World Cup: विराट कोहलीने रचला 'विश्वविक्रम'! अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच खेळाडू

Virat Kohli world record : भारत विरुद्ध इंग्लंड (INDvsENG) सामन्यात विराटने इतिहास रचला आहे. विश्वविक्रम (World Record) रचण्यासाठी विराटला 42 धावांची गरज होती.

Updated: Nov 10, 2022, 03:59 PM IST
Virat Kohli T20 World Cup: विराट कोहलीने रचला 'विश्वविक्रम'! अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच खेळाडू title=
Virat Kohli world record

Virat Kohli T20 World Cup 2022:  सध्या भारत विरुद्ध इंग्लंड (INDvsENG 2nd Semi-Final) यांच्यात दुसरा सेमीफायनल सामना खेळला जात आहे.  या सामन्यात भारताने 169 धावांचं आव्हान इंग्लंडसमोर ठेवलं. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांच्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर टीम इंडियाने 168 धावा केल्या. त्यानंतर आता इंग्लंडचा संघ फायनल गाठण्यासाठी आक्रमक फलंदाजी करताना दिसत आहे.

टीम इंडियाची (Team India) रन मशिन फुल्ल फॉर्ममध्ये दिसत आहे. एकीकडे विकेट पडत असताना विराट मैदानात पाय रोवून उभा राहिला. सुरूवातीला हळू खेळत विराटने नजर जमवली आणि नंतर आपला दांडपट्टा सुरू केला. विराटने 39 चेंडूत आपलं अर्धशतक पुर्ण केलं. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर विराट बाद झाला. मात्र, विराट आपलं काम चोखपणे पुर्ण करून गेला होता.

विराटने रचला विश्वविक्रम - 

भारत विरुद्ध इंग्लंड (INDvsENG) सामन्यात विराटने इतिहास रचला आहे. विश्वविक्रम (World Record) रचण्यासाठी विराटला 42 धावांची गरज होती. विराटने चौकार खेचत हा विक्रम रचला. टी-ट्वेंटी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 4000 धावा पुर्ण करणारा विराट पहिला खेळाडू ठरला आहे. 115 सामन्यात विराटने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

आणखी वाचा- IND vs ENG: उगाच म्हणत नाही King Kohli, विराटचा शॉट पाहून वोक्सही आवाक्...पाहा Video

T20 इंटरनॅशनलमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू - 

विराट कोहली (भारत) - 115 मॅच  - 4008 रन 
रोहित शर्मा (भारत) - 148 मॅच  - 3853 रन 
मार्टिन गुप्टिल (न्यूजीलैंड)  - 122 मॅच  - 3531 रन
बाबर आजम (पाकिस्तान)  - 98 मॅच  - 3323 रन
पॉल स्टर्लिंग (आर्यलँड)  - 121 मॅच  - 3181 रन