मुंबई : पोलिओने प्रभावीत धर्मवीर पाल टीम इंडियाचा सर्वात मोठा फॅन आहे. अनेक वर्षापासून त्याला बॉऊंड्रीवर आपण पाहिले असेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बहुतांशी लोक त्याला ओळखतात. पण आता तो बाऊंड्री बॉय म्हणून तुम्हांला दिसणार नाही. आता तो स्टेडिअममध्ये बसून मॅच पाहताना दिसणार आहे. 


सोशल मीडियावर झालेल्या जोरदार टीकेनंतर बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे. पोलिओ  झाला असताना त्याला बॉऊंड्रीवर चेंडू उचलण्याचे काम दिले जाते. अशी टीका करण्यात आली. त्यानंतर बीसीसीआयने सर्कुलर काढून स्पष्ट केले की आता धर्मवीर याला  बॉल बॉय म्हणून ठेवण्यात येणार नाही. 


सचिनच्या अखेरच्या सामन्यातही होता...


डाव्या हातावर टॅटू काढलेला धर्मवीर म्हणतो, की क्रिकेट माझ्या जीवनाचा आधार आहे. धर्मवीर अनेक क्रिकेटरला ओळखतो. २०१३मध्ये सचिनच्या फेअरवेल टेस्टमध्ये तो बाऊंड्रीवर होता. त्यावेळी सचिन धर्मवीर आणि दुसऱा फॅन सुधीर चौधरी यांना भेटला होता. सुधीर आपल्या शरिरावर पेंट लावून शरिरावर तेंडुलकर लिहितो आणि प्रत्येक सामन्यात हजर असतो.


सचिनने या फॅन्सला म्हटले होते की, तुमच्यामुळे आम्ही क्रिकेट खेळतो. इंडियन क्रिकेटला तुमच्यासारख्या फॅन्सची गरज आहे. 


युवराजने एकदा धर्मवीरबद्दल म्हटले होती की, एक दिव्यांगामध्ये क्रिकेटची इतक वेड पाहून आम्हीही त्यांची मदत करायला पाहिजे. ते नेहमी आमचे सामने पाहायला येतात. 


सोशल मीडियावर टीका


ऑस्ट्रेलिया सिरीजनंतर बीसीसीआयला टॅग करून अनेकांनी प्रश्न उपस्थित केला होता. फिजिकली चॅलेंज्ड मुलाला बॉल बॉयचे काम का दिले. असे अनेकांनी प्रश्न उपस्थित केला.  यानंतर बीसीसीआयचे जनरल मॅनेजर रत्नाकर शेट्टी यांनी सर्व राज्यांच्या असोसिएशला सल्ला दिला की, न्यूझीलंड-भार आणि श्रीलंका सिरीजसाठी कोणत्याही दिव्यांगाला बॉल बॉयचे काम नका देऊ. त्यांना स्टेडिअममध्ये बसण्यासाठी योग्य ती जागा द्या. 


कुठला आहे धर्मवीर 


धर्मवीर मध्यप्रदेशच्या मुरैना जिल्ह्यातील आहे. तो आठ महिन्यांचा असताना त्याला पोलिओ झाला होता. तो किशोरवयात क्रिकेटचा जबरदस्त फॅन झाला.   फिजिकल चॅलेंज्ड स्पर्धेत मध्यप्रदेशच्या टीमचा कर्णधार होता. 


धर्मवारी टीम इंडियाला पाठिंबा देण्यासाठी ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांत गेला आहे. धर्मवीर २००४ पासून गेमशी जोडला गेला आहे.