नवी दिल्ली : श्रीलंकेविरूद्ध ५व्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात भारताचा सलामी फलंदाज रोहित शर्मा हा भलेही काही खास कामगिरी करू शकला नाही. मात्र तरीही त्याने असा एक रेकॉर्ड आपल्या नावावर केलाय, जो अनेक दिग्गजांनाही करता आला नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित शर्मा हा श्रीलंकेत खेळल्या गेलेल्या बायलेट्रल सीरीज दरम्यान ३०० रन करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. 


पहिला भारतीय फलंदाज -


याआधी एकही भारतीय फलंदाज श्रीलंकेत एका सीरीजमध्ये ३०० रन्स करू शकला नाही. पण हा कारनामा रोहित शर्माने करून दाखवला आहे. रोहितने सीरीज दरम्यान ५ सामन्यांमध्ये ७५.५० च्या सरासरीने ३०२ रन्स केले आहेत. त्यात त्याच्या दोन शतकांचा आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. याआधी हा रेकॉर्ड केवळ इंग्लंडचा जो रूट करू शकला आहे. एकाही भारतीय खेळाडूला हे करता आले नाही. हा रेकॉर्ड आपल्या नावावर करणारा रोहित हा जगातला दुसरा खेळाडू ठरला आहे. 


सीरीजवर कब्जा -


भारताने श्रीलंकेला पाचव्या वनडे मध्ये सहा विकेटने मात दिली. यासोबत भारताने सीरीजवर ५-० असा कब्जा केला. प्रेमदास स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात श्रीलंकेने भारतासमोर २३९ रन्सचे लक्ष्य दिले होते. भारताने ४६.३ ओव्हर्समध्ये चार विकेट गमावून हा स्कोर पूर्ण केला.