T20 World Cup Final आधी हर्षा भोगलेंची ही पोस्ट वाचाच; विराटचा उल्लेख करत म्हणाले...
Harsha Bhogle Post For Virat Kohli: विराट कोहलीला यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. विराट या वर्ल्ड कपमध्ये दोन वेळा भोपळाही न फोडता बाद झाला.
Harsha Bhogle Post For Virat Kohli: भारताचे प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगलेंनी सोशल मीडियावरुन भारताचा स्फोटक फलंदाज विराट कोहलीला लक्ष्य करणाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतलं आहे. सध्या सुरु असलेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीला नावाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे आता अनेकांकडून विराटची खिल्ली उडवली जात आहे. विराट कोहलीला टी-20 वर्ल्ड कपमध्ये 7 सामन्यांमध्ये केवळ 75 धावाच करता आल्या आहेत. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू अशी ओळख असलेल्या विराटला यंदाचा वर्ल्ड कप मात्र कटू आठवणीप्रमाणे राहिला आहे.
विराटवर टीका
एकीकडे विराट स्ट्रगल करत असतानाच दुसरीकडे भारताचा कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत यांनी उत्तम फलंदाजी केल्याचं पाहायला मिळालं आहे. विराट कोहलीची कामगिरी ही संघाच्या दृष्टीने सध्या चिंतेचा विषय असला तरी विराटच्या क्षमतेवर आम्हाला काहीही शंका नसल्याचं रोहितने भारताने फायनलचं तिकीट निश्चित केल्यानंतर म्हटलं आहे. मात्र काही चाहत्यांनी अगदी कंबरेखाली जात विराटवर टीका केली आहे.
नक्की वाचा >> '7 महिन्यात रोहित दुसऱ्यांदा वर्ल्ड कप फायनल हरला तर..'; T20 वर्ल्ड कप फायनलआधी गांगुली स्पष्टच बोलला
विराटला पाठिंबा देण्याची गरज
आपल्या रोखठोक भूमिकेसाठी ओळखले जाणारे समालोचक हर्षा भोगले यांनी क्रिकेटचा आवाज म्हणून कॉमेंट्री बॉक्समधून भूमिका बजावतानाच आता सोशल मीडियावरुन क्रिकेटपटूसांठी आवाज उठवल्याचं दिसत आहे. विराट कोहलीचा सध्या बॅड पॅच सुरु असून आपण साऱ्यांनी त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे असं हर्षा यांनी म्हटलं आहे. विराटला सोशल मीडियावरुन लक्ष्य करण्याऐवजी त्याला पाठिंबा देणं गरजेचं आहे, असं हर्षा यांनी म्हटलं आहे.
नक्की वाचा >> टीम इंडियाचे चाहते असाल तर हे वाचू नका... ODI वर्ल्ड कपची पुनरावृत्ती? फायनलचं मैदान भारतासाठी पनवती
हर्षा नेमकं काय म्हणाले?
"काही वेळेस फार संतापलेल्या आणि विखारी पद्धतीची टीका फॅन क्लब्सच्या माध्मयातून सोशल मीडियावरुन केली जाते. जेव्हा खेळाडू उत्तम कामगिरी करत नसेल तेव्हा आपण चाहते म्हणून आपला दर्जा दाखवून दिला पाहिजे. सध्याचा काळ हा विराट कोहलीच्या पाठीशी उभं राहण्याचा आहे. विराट कोहली फायनलमध्ये सामना जिंकवून देणारी खेळी करेल यात शंका नाही. मात्र ते काहीही असलं तरी आपण त्याच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे," असं हर्षा भोगलेंनी म्हटलं आहे.
नक्की वाचा >> भारत सेटींग लावून T20 वर्ल्ड कप फायनलमध्ये, इंझमामचा गंभीर आरोप; म्हणाला, 'पाकिस्तानला कधीच..'
विराटची कामगिरी कशी?
विराटने 7 सामन्यांमध्ये केवळ 75 धावा केल्या आहेत. विराट कोहलीच्या या बॅड पॅचमध्ये त्याच्या नावावर दोन गोल्डन डक म्हणजेच भोपळाही न फोडता बाद झालेल्या इनिग्सची नोंद झाली आहे. गुरुवारी वर्ल्ड कपच्या सेमी-फायनलमध्येही विराट इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात स्वस्तात तंबूत परतला. सेमी-फायनलमध्ये विराट 9 बॉलमध्ये 9 धावा करुन तंबूत परतला. सामन्याच्या तिसऱ्याच ओव्हरमध्ये तो बाद झाला. विराटने वर्ल्ड कप स्पर्धेत केलेल्या या सुमार कामगिरीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केली जात आहेत.