India vs Sri Lanka Squad Announcement: भारतात क्रिकेट, मनोरंजन आणि राजकारण या तीन गोष्टींबद्दल कधीही कुठेही आणि कोणाशीही चर्चा करु शकतो असं म्हटलं जातं. भारतामध्ये या तिन्ही गोष्टींची प्रचंड क्रेझ आहे. त्यातही दोन क्षेत्र एकत्र आल्यानंतर अशा बातमीकडे विशेष लक्ष जातं. सध्या लोकसभेतील खासदार शशी थरुर हे क्रिकेटसंदर्भातील एका विधानामुळे चर्चेत आहेत. थरुर हे फार मोठे क्रिकेट चाहते आहेत. त्यांनी गुरुवारी भारतीय क्रिकेट नियाम मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने श्रीलंकन दौऱ्यासाठी निवडलेल्या दोन्ही संघांमधील खेळाडूंची यादी पाहून उघडपणे टीका केली आहे. 


उघडपणे व्यक्त केली नाराजी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीसीसीआयने गौतम गंभीरला प्रशिक्षक केल्यानंतर पहिल्यांदाच परदेश दौऱ्यासाठी संघ जाहीर केला. विशेष म्हणजे बीसीसीआयने एकदिवसीय क्रिकेटसाठी एक आणि टी-20 साठी वेगळा संघ जाहीर केला असला तरी या दोन्ही संघांमधून काही नामांकित खेळाडूंचा समावेशच करण्यात आलेला नाही. अनेकांना वगळलेल्या खेळाडूंची नाव पाहून आश्चर्याचा धक्का बसला आहे. याचसंदर्भात थरुर उघडपणे बोलले आहेत.


संजू सॅमसनसारख्या खेळाडूला एकदिवसीय संघातून आणि अभिषेक शर्मासारख्या तरुण क्रिकेटपटूला टी-20 मधून वगळल्याबद्दल थरुर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सॅमसनला टी-20 संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र दुसरीकडे झिम्बावेविरुद्धच्या चार सामन्यांपैकी एकामध्ये दमदार शतक झळकावणाऱ्या अभिषेक शर्माला वगळण्यात आलं आहे. ही गोष्ट थरुर यांना खटकली आहे. 


नक्की वाचा >> 'आमच्यातील वादाचा परिणाम...'; गंभीर प्रशिक्षक झाल्यानंतर विराटने BCCI ला स्पष्ट शब्दात सांगितलं


थरुर काय म्हणाले?


भारताच्या दोन्ही संघाची यादी शेअर करत थरुर यांनी संघ निवडीवर भाष्य केलं आहे. "भारत या महिन्यात करणार असलेल्या श्रीलंक दौऱ्यासाठी निवडलेला संघ फारच रंजक आहे. आपल्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावणाऱ्या संजू सॅमसनला एकदिवसीय संघात स्थान नाही. तर भारत आणि झिम्बावेदरम्यानच्या टी-20 मालिकेमध्ये शतक झळकावणाऱ्या अभिषेक शर्माचीही निवड झालेली नाही. भारतामध्ये कादाचित यशाचे रंग हे निवडकर्त्यांना फारसे महत्त्वाचे वाटत नाहीत. असो भारतीय संघाला शुभेच्छा," असं थरुर यांनी म्हटलं आहे.


नक्की वाचा >> Inside Story: सूर्या की हार्दिक? कॅप्टनपदावरुन BCCI च्या बैठकीत तुफान राडा; 'या' 2 गोष्टींच्या आधारे ठरलं



श्रीलंकन दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ: 


रोहित शर्मा (कर्णधार)
शुभमन गिल (उपकर्णधार)
विराट कोहली
के. एल. राहुल (विकेटकीपर)
ऋषभ पंत (विकेटकीपर)
श्रेयस अय्यर
रियान पराग
शिवम दुबे


नक्की वाचा >> गंभीरसमोर BCCI ला नमतं घ्यावच लागलं! साधं कॉन्ट्रॅक्टही न केलेला खेळाडू टीम इंडियात


कुलदीप यादव,
वॉशिंग्टन सुंदर
अक्षर पटेल
मोहम्मद सिराज
अर्शदीप सिंग
खलील अहमद
हर्षित राणा


श्रीलंकन दौऱ्यासाठी भारताचा टी-20 मालिकेसाठीचा संघ :


सूर्यकुमार यादव (कर्णधार)
शुभमन गिल (उपकर्णधार)
यशस्वी जयस्वाल
रिंकू सिंग
रियान पराग
ऋषभ पंत (विकेटकीपर)
संजू सॅमसन (विकेटकीपर)
हार्दिक पांड्या


नक्की वाचा >> सूर्यकुमार यादवच्या कर्णधारपदाची आकडेवारी, Winning Percentage पाहून बसेल धक्का


शिवम दुबे
अक्षर पटेल
वॉशिंग्टन सुंदर
रवी बिश्नोनी
अर्शदीप सिंग
खलील अहमद
मोहम्मद सिराज