मिळालं नाहीये मिळवलंय... सूर्यकुमार यादवच्या कर्णधारपदाची आकडेवारी, Winning Percentage पाहून बसेल धक्का

Suryakumar Yadav Captaincy Record: रोहित शर्मानंतर भारतीय संघाचं नेतृत्व हार्दिक पंड्या करेल असं मानलं जात असतानाच अचानक सूर्यकुमारकडे भारतीय संघाची धुरा कशी सोपवण्यात आली असा प्रश्न विचारला जात आहे. मात्र सूर्यकुमारच्या कॅप्टन्सीचा रेकॉर्ड पाहिल्यानंतर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. एकदा ही आकडेवारी पाहाच...

| Jul 19, 2024, 09:35 AM IST
1/9

Suryakumar Yadav Captaincy Record

श्रीलंकेच्या आगामी दौऱ्यासाठी गुरुवारी सायंकाळी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भारतीय संघाची घोषणा केली. गौतम गंभीर प्रशिक्षक झाल्यानंतरचा भारताचा हा पहिलाच दौरा असून संघनिवडीवर गंभीरचा प्रभाव दिसून येत आहे. कशात काही नसतानाच अचानक सूर्यकुमार यादवकडे भारताच्या टी-20 संघाचं कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे.   

2/9

Suryakumar Yadav Captaincy Record

टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर रोहित शर्माने टी-20 अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर हार्दिक पंड्या भारतीय टी-20 संघाचा कर्णधार होईल असं मानलं जात होतं. मात्र हार्दिकला कर्णधारच काय साधं उपकर्णधारपदही देण्यात आलेलं नाही. हार्दिकच्या जागी शुभमन गिलला उपकर्णधार करण्यात आलं आहे.  

3/9

Suryakumar Yadav Captaincy Record

मात्र गीलची उपकर्णधारपदी वर्णी लागण्यापेक्षाही सूर्यकुमारला थेट कर्णधारपद दिल्याबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक केलं आहे. पण सूर्यकुमारचा कर्णधार म्हणून रेकॉर्ड पाहिल्यावर तुम्हीही आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहणार नाही. अनेक स्पर्धांमध्य सूर्यकुमारने संघाचं नेतृत्व केलं आहे. त्याचा कर्णधारपदाचा रेकॉर्ड कसा आहे पाहूयात...  

4/9

Suryakumar Yadav Captaincy Record

सूर्यकुमारने कर्णधार म्हणून आतापर्यंत टी-20 अंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांमध्ये फारच समाधानकारक कामगिरी केली आहे. सूर्यकुमारने आतापर्यंत 7 टी-20 अंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचं नेतृत्व केलं आहे.

5/9

Suryakumar Yadav Captaincy Record

सूर्यकुमारने नेतृत्व केलेल्या टी-20 सामन्यांपैकी 5 सामने भारताने जिंकले असून 2 सामने गमावले आहेत. सूर्याने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या तगड्या संघांविरुद्ध कर्णधारपद भूषवलं आहे. म्हणजेच विजयाची टक्केवारी 72 टक्क्यांहून अधिक आहे. 

6/9

Suryakumar Yadav Captaincy Record

भारतीय संघाचा मिस्टर 360 डिग्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सूर्यकुमारने मुंबईसाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळतो. सूर्यकुमार यादवने रणजी ट्रॉफीमध्ये 6 सामन्यांमध्ये मुंबईचं नेतृत्व केलं आहे. या सामन्यांपैकी 1 सामना मुंबई जिंकला, 2 सामने गमावले आणि 3 अनिर्णित राहिले.

7/9

Suryakumar Yadav Captaincy Record

घरगुती टी-20 ट्रॉफी म्हणजेच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेमध्येही सूर्यकुमारने मुंबईच्या संघाचं नेतृत्व केलं आहे. मुश्ताक अली स्पर्धेमध्ये सूर्यकुमारने एकूण 16 सामन्यांमध्ये मुंबईचं नेतृत्व केलं असून त्यातील 10 सामने जिंकवून दिले आहेत. तर 6 सामन्यांमध्ये मुंबई पराभूत झाली. म्हणजेय येथे विजयाची टक्केवारी 62 टक्के इतकी आहे. 

8/9

Suryakumar Yadav Captaincy Record

सूर्यकुमार यादवने इंडियन प्रिमिअर लीगमध्येही कर्णधारपद भूषवलं आहे. अर्थात इतर स्पर्धांच्या तुलनेत आयपीएलमध्ये त्याला कर्णधारपद भूषवण्याची फारशी संधी मिळालेली नाही. त्याने केवळ एका सामन्यात मुंबई इंडियन्सचं नेतृत्व केलं आणि तो सामना मुंबई जिंकून दिला आहे. म्हणजेच विजयाची टक्केवारी 100 इतकी आहे. 

9/9

Suryakumar Yadav Captaincy Record

त्यामुळे आता पुन्हा अंतरराष्ट्रीय संघाची धुरा हाती घेतल्यानंतर सूर्यकुमार कशी कामगिरी करतो हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसं त्याने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कर्णधार म्हणून उत्तम कामगिरी केली असली तरी आता श्रीलंकेविरुद्ध त्याच्या नेतृत्वाखाली संघ कसा खेळतो हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.