`माझ्या सर्वात मोठ्या शत्रूसाठी...`; `ती` रडत, विव्हळ Olympics बाहेर पडल्यानंतर सिंधूची पोस्ट
PV Sindhu Post Olympics 2024: भारतीय बॅडमिंटनपटूने केलेली ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत असून तिने या पोस्टमध्ये एक फोटोही शेअर केला असून या पोस्टला लाखोंच्या संख्येनं लाईक्स आहेत.
PV Sindhu Post Olympics 2024: ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती बॅडमिंटनपटू कॅरोलिना मरीनने पॅरिस ऑलिम्पिकच्या महिला एकेरी स्पर्धेमधून माघार घेतली आहे. उपांत्यफेरीच्या सामन्यामध्ये चीनच्या ही बिंगजीआओविरुद्धच्या सामन्यामधून कॅरोलिनाने माघार घेतील. सामन्यादरम्यान कॅरोलिनाच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाल्याने तिला नाइलाजास्तव माघार घ्यावी लागली. अगदी रडत, विव्हळ कॅरोलिनाने या अत्यंत महत्त्वाच्या समान्यामधून माघार घेतल्याचं कोणत्याही क्रीडा चाहत्याला हेलावून सोडणारं दृष्य ऑलिम्पिकच्या सेमीफायलनमध्ये पाहायला मिळालं.
रिओमध्ये तिने सिंधूला पराभूत केलेलं
कॅरोलिना मरीनला या पूर्वीही अनेकदा गुडघ्याला दुखापत झाली आहे. यापूर्वी कॅरोलिनाच्या दोन्ही गुडघ्यांवर शस्रक्रीया करण्यात आली आहे. 2016 साली रिओ येथील ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीमध्ये भारताच्या पी. व्ही. सिंधूला पराभूत करुन सुवर्णपदक पटकावलं होतं. कॅरोलिना मरीन आणि सिंधू यांची कोर्टवरील दुष्मनी जगजाहीर आहे. या दोघीही मैदानावर एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाही. आता कॅरोलिना मरीना दुखापतीमुळे बाहेर पडल्यानंतर सिंधूने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे.
सिंधू म्हणाली, 'माझ्या सर्वात मोठ्या शत्रूसाठी...'
"या स्पर्धेतील माझ्या सर्वात मोठ्या शत्रूसाठी आणि जवळच्या मैत्रिणीसाठी म्हणजेच कॅरोलिनासाठी... मी तुझ्यासाठी खास सकारात्मक ऊर्जा या पोस्टमधून पाठवत आहे. तू फार सुंदर पद्धतीने खेळत होतीस. मी तुझी पाठराखण करत होते," असं सिंधूने तिच्या पोस्टच्या पहिल्या पॅरामध्ये म्हटलं आहे. कॅरोलिना मरीनबरोबरचा फोटोही या पोस्टमध्ये अटॅच केला आहे.
नक्की वाचा >> PHOTOS: गुप्तांगामुळे Olympic 2024 मधून बाहेर! मेडलच्या शर्यतीत त्याच्यासोबत असं काही घडलं की...
'मी तुला चांगली ओळखते, त्यामुळेच...'
"मला फार आतून हे वाटतंय की या स्पर्धेमध्ये मला तुझ्याविरुद्ध खेळायलाच आवडत नाही. तुझी इच्छाशक्ती, निर्धार आणि समोरच्या खेळाडूवर दबाव निर्माण करण्याची क्षमतेची कशाशीही तुलना करता येणार नाही," असं सिंधूने म्हटलं आहे. "मी तुला चांगली ओळखते. त्यामुळे तुझी इच्छाशक्ती पाहता तुझ्या या दुखापतीमधून तू नक्कीच सावरशील याची खात्री आहे. फक्त यासाठी थोडा वेळ दे. तुला फक्त इतकं सांगेन की मी कायमच तुझी सर्वात मोठी पाठराखीण आहे," असं सिंधूने पोस्टच्या शेवटी म्हटलं आहे.
नक्की वाचा >> ...तर मी पुन्हा कधीच दिसलो नसतो; Olympic मधील 'त्या' Viral Shooter चं विधान चर्चेत
मागील ऑलिम्पिकही दुखापतीमुळे खेळली नाही
कॅरोलिना मरीनने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये दुखापतीमुळेच सहभाग घेतला नव्हता. आता तिला पॅरिस ऑलिम्पिकमधूनही बाहेर पडावं लागलं असलं तरी सिंधूची ही खास पोस्ट तिच्या दुखावर नक्कीच फुंकर मारणारी ठरेल यात शंका नाही.