PHOTOS: गुप्तांगामुळे Olympic 2024 मधून बाहेर! मेडलच्या शर्यतीत त्याच्यासोबत असं काही घडलं की...

Olympic 2024 Player Out Of Medal Race Due To His Private Part: हा विचित्र प्रकार घडला तेव्हा हा खेळाडू त्याच्या घरच्या मैदानावर त्याच्या देशाच्या प्रेक्षकांसमोरच खेळत होता. त्याच्याकडून देशाला पदकाची अपेक्षा होती. मात्र शेवटच्या क्षणी हा विचित्र प्रकार घडला. सध्या या घटनाक्रमाचे फोटो व्हायरल झालेत. नेमकं घडलं काय पाहूयात...  

| Aug 04, 2024, 08:48 AM IST
1/10

Anthony Ammirati Olympic 2024

सध्या जगभरात त्याची चर्चा त्याच्या यशामुळे नाही तर अपयशामुळे आहे. अगदीच विचित्र पद्धतीने तो ऑलिम्पिकबाहेर फेकला गेला आहे. नेमका हा खेळाडू आहे कोण अन् घडलंय काय पाहूयात...

2/10

Anthony Ammirati Olympic 2024

फ्रान्सचा अॅथलिट अँथनी अमिरती धक्कादायक पद्धतीने ऑलिम्पिक 2024 च्या स्पर्धेबाहेर फेकला गेला आहे. हा अँथनीबरोबरच त्याच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का आहे.   

3/10

Anthony Ammirati Olympic 2024

21 वर्षीय अँथनी अमिरती हा नक्कीच ऑलिम्पिकचं यजमानपद भूषवणाऱ्या फ्रान्ससाठी पदक पटकावेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र या अपेक्षांना शनिवारी सुरुंग लागला.  

4/10

Anthony Ammirati Olympic 2024

घरच्या चाहत्यांसमोर खेळताना अँथनी अमिरतीला पात्रता फेरीमध्ये अपयशाचं तोंड पहावं लागलं. पोल व्हॉल्ट प्रकारामध्ये सहभागी झालेल्या अँथनीला पुढील फेरीमध्ये पात्र होता आलं नाही.  

5/10

Anthony Ammirati Olympic 2024

अ गटामध्ये अँथनी अमिरतीला 5.60 मीटरची उंच उडी मारत 12 वं स्थान मिळालं. मात्र अँथनी अमिरतीने केलेल्या तिन्ही प्रयत्नांपैकी शेवटच्या प्रयत्नामध्ये एका विचित्र पद्धतीने तो थोडक्यात पात्र ठरण्यापासून दूर राहिला. 

6/10

Anthony Ammirati Olympic 2024

पोलच्या मदतीने उंच उडी घेण्याच्या या खेळामध्ये अँथनी अमिरतीने पात्र होण्यासाठी 5.70 मीटर उंचीची उडी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा या प्रयत्न अपयशी ठरला तो त्याच्या गुप्तांगामुळे.  

7/10

Anthony Ammirati Olympic 2024

तुम्ही वाचलं ते बरोबर आहे अँथनी अमिरतीचं गुप्तांग उडी मारताना क्रॉसबारला लागलं आणि तो खाली पडला. त्याला 5.70 मीटरची उडी यशस्वीपपणे पूर्ण करता आली नाही. हाच तो क्षण जेव्हा अँथनीचं गुप्तांग क्रॉसबारला लागलं. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.  

8/10

Anthony Ammirati Olympic 2024

पहिल्यांदाच ऑलिम्पिक खेळणाऱ्या अँथनी अमिरती 12 व्या स्थानी राहिला. पहिले 10 खेळाडू पात्र झाले. तर पहिल्यांदाच ऑलिम्पिक खेळणाऱ्या अँथनी अमिरतीला स्पर्धेबाहेर पडावं लागलं.  

9/10

Anthony Ammirati Olympic 2024

अनेकांनी अँथनी अमिरतीचा हा शेवटचा प्रयत्न पाहून नशिबाला दोष दिला तर काहींनी हे त्याचं पहिलचं ऑलिम्पिक असून यामधून तो बरंच काही शिकेल असं म्हणत त्याला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. 

10/10

Anthony Ammirati Olympic 2024

मात्र गुप्तांगामुळे ऑलिम्पिक पदकाच्या शर्यतीमधून बाहेर पडलेला अँथनी अमिरती चर्चेचा विषय ठरतोय हे मात्र नक्की.