Virat Kohli Asia Cup 2023 : उद्या म्हणजेच 10 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात खेळवल्या जाणाऱ्या हायव्होल्टेज सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या स्टार फलंदाज विराट कोहली याला एका श्रीलंकेच्या फॅनने चक्क चांदीची बॅट गिफ्ट म्हणून दिली. श्रीलंकन फॅन्सचं सोन्यासारखं हृदय पाहून किंग कोहली (Virat Kohli) देखील भावूक झाल्याचं दिसून आलं. प्रॅक्टिस करून घामाजलेल्या विराटच्या डोळ्यांतील आनंद पाहण्याजोगा होता. विराट कोहलीचा हा व्हिडीओ बीसीसीआयने (BCCI) शेअर केला आहे. सोशल मीडियावर  व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये विराट कोहली चाहत्यांशी गप्पा मारताना दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आशिया कपमध्ये 10 सप्टेंबर रोडी कोलंबोच्या आर. प्रेमदास स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळवला जाणार आहे. त्याआधी आता टीम इंडियाचे खेळाडू अॅक्टिवेटेड झाल्याचं दिसून आलंय. प्लेयर्सने सामन्यापूर्वी मैदानात घाम गाळला. पाकिस्तानी बॉलिंग लाईनअपची मजबूत तयारी केलीये. भारताचा सामना म्हटल्यावर प्रेक्षक येणार... श्रीलंकेच्या प्रेक्षकांनी सरावादरम्यान हजेरी लावली होती. त्यावेळी विराट कोहलीच्या काही चाहत्यांनी आपल्या लाडक्या प्लेयर्सची भेट घेतली. विराटने देखील मोठं मन दाखवत चाहत्यांना वेळ दिला. त्यानंतर त्याने प्लेयर म्हणून कोणकोणत्या गोष्टींना महत्त्व दिलं पाहिजे, यावर चर्चा गेली. त्यानंतर चाहत्यांनी विराटला सरप्राईज दिलं. एका चाहत्याने विराटला थेट चांदीची बॅट दिली.


पाहा Video



बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडीओत विराट कोहली श्रीलंकेच्या खेळाडूंना टिप्स देताना दिसत आहे. कोहलीने त्यावेळी चांगल्या प्रदर्शनाचं कौतुक देखील केलंय. सोशल मीडियावर हा व्हिडीओ अनेकांनी शेअर केला असून, त्याला उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतोय. त्यामुळे आता किंग कोहली प्रतिमा आणखीन उंचावत असल्याचं पहायला मिळतंय. काहींनी कोहलीच्या मेहनतीचं प्रशंसा केलीये. तर काहींनी त्याच्या निर्मळ स्वभावाचे गोडवे गायले आहेत. मात्र, कोहलीच्या चेहऱ्यावरचं सुख पाहण्याजोगं होतं. 


आणखी वाचा - Ben Stokes : आधी निवृत्ती अन् आता कमबॅक, गुडघ्याचं ऑपरेशन असतानाही म्हणतो 'वर्ल्ड कप खेळणार'


दरम्यान, आशिया कपमधील सर्वात महत्त्वाचा असा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायप्रेशर सामना उद्या दुपारी 3 वाजल्यापासून खेळवला जाणार आहे. 2 सप्टेंबर रोजी झालेला सामना पावसाने धुवून निघाल्यानंतर आता टीम इंडियासाठी उद्या महत्त्वाचा दिवस असणार आहे. आशिया कपच्या फायनल सामन्यात देखील टीम इंडिया आणि पाकिस्तानी संघ आमने सामने येतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.