Sunil Gavaskar on Tendulkar vs Kohli: भारतीय क्रिकेट जगतात अशी अनेक खेळाडू आहेत ज्यांची नाव आजही चर्चा असते. असे काही खेळाडू आहेत ज्यांच्या खेळापुढे सगळेच फिके पडतात. अनेकदा या खेळाडूंची एकमेकांशी तुलनाही केली जाते. यामध्ये सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्यात कोण श्रेष्ठ? असा प्रश्न नेहमीच विचारला जातो. अलीकडेच पुम्हा पुन्हा एकदा तेंडुलकर आणि कोहली (Tendulkar vs Kohli) यांच्यात कोण सर्वोत्तम आहे. अशा प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. यावेळी हा प्रश्न सुनील गावस्कर यांना विचारण्यात आला. गावस्कर यांनी दिलेल्या उत्तराने प्रेक्षकांनी फार आनंद लुटला.  


गावस्कर यांनी काय उत्तर दिले?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'द फ्रंट बार'ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान गावस्कर यांना सचिन आणि कोहली यांच्यात कोणाचे मत चांगले आहे, असे विचारण्यात आले.  यावर, माजी भारतीय कर्णधाराने प्रतिक्रिया दिली आणि उत्तर दिले की, "मला वाटते ... प्रत्येकजण उत्तम आहे, परंतु माझ्या मते 'सर गारफील्ड सोबर्स' चांगले होते." गावसकरांच्या या उत्तरामुळे चाहत्यांना काय प्रतिक्रिया द्यावी हे समजेल नाही. चाहत्यांमध्ये गोधळ निर्माण झाला.   


हे ही वाचा: ऑक्शनमध्ये unsold पण तरीही 'हे' खेळाडू IPL 2025 मध्ये खेळू शकतात, कसे? जाणून घ्या


 


 



 


हे ही वाचा: अवघ्या 22 व्या वर्षी निवृत्ती, 70000 कोटींहून अधिक संपत्ती; सचिन-धोनी नाही तर 'हा' आहे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू


कोण आहेत सर गारफील्ड सोबर्स? 


'सर गारफील्ड सोबर्स' हे क्रिकेटच्या इतिहासातील महान अष्टपैलू खेळाडू मानले जातात. त्यांनी त्याच्या अविश्वसनीय प्रतिभेने अप्रतिम कामगिरी केली. सोबर्स यांनी  26 कसोटी शतके झळकावली, ज्यात 1958 मध्ये पाकिस्तानविरुद्ध नाबाद 365 धावा केल्या होत्या, जे 36 वर्षे झाल्यावर आजही नाबाद राहिले आहे. सोबर्स हे एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू होता, ज्याने बॅट, बॉल किंवा मैदानात आपल्या क्षेत्ररक्षणाने प्रभावित केले. 1968 मध्ये, नॉटिंगहॅमशायरकडून खेळताना, प्रथम श्रेणी सामन्यात एका षटकात सहा षटकार मारणारा ते पहिला क्रिकेटर बनला.


नेटिझन्सची प्रतिक्रिया 


 



 



 


हे ही वाचा: Rohit Sharma: "भाई, १० वर्ष झाली..." रोहित शर्माने पूर्ण केली चाहत्यांची इच्छा; जबरा फॅनचा Video Viral


 


क्रिकेट जगतातील पहिल्या सुपरस्टार्सपैकी एक


गारफील्ड सोबर्स हे जागतिक क्रिकेटमधील पहिल्या सुपरस्टार्सपैकी एक होते. ते मैदानावर आणि मैदानाबाहेर त्याच्या खिलाडूवृत्ती आणि सभ्यतेसाठी ओळखले जायचे. तर सचिनच्या नावावर 200 कसोटीत 15921 धावा आहेत, आणि कसोटीत 51 शतके आहेत. तेंडुलकर हा जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा फलंदाज आहे. त्याचबरोबर कोहलीने आतापर्यंत कसोटीत 30 शतके झळकावली आहेत. अलीकडच्या काळात कोहलीचा फॉर्म हा सरासरीचा आहे. तरीही या पुढे तो उत्तम खेळ खेळलेल अशी सगळ्यांचा विश्वास आहे.