अवघ्या 22 व्या वर्षी निवृत्ती, 70000 कोटींहून अधिक संपत्ती; सचिन-धोनी नाही तर 'हा' आहे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू

Most Richest Cricketer: या खेळाडूकडे एवढी संपत्ती आहे की तो स्वत:साठी आयपीएलचा संघ उभा करू शकतो. पण दुर्दैवाने तो कधीही आयपीएल सामना खेळू शकला नाही.

तेजश्री गायकवाड | Updated: Dec 4, 2024, 07:12 AM IST
अवघ्या 22 व्या वर्षी निवृत्ती, 70000 कोटींहून अधिक संपत्ती; सचिन-धोनी नाही तर 'हा' आहे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू title=

World's Richest Cricketer Retired At 22: मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांपेक्षाही जास्त संपत्ती कोणाकडे असेल तर ते क्रिकेटर्स आहेत. जगभरातील क्रिकेटर्सकडे अमाप संपत्ती आहे.सध्याच्या काळात भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू कोण? (World  Richest Cricketer)  असा प्रश्न तुम्हाला विचारला गेला तर कदाचित तुम्ही सचिन तेंडुलकर, विराट कोहली किंवा एमएस धोनीचे नाव घ्याल. पण एका भारतीय क्रिकेटपटूंची संपत्तीही हजार कोटींहून या नामांकित क्रिकेर्टसपेक्षा जास्त आहे. होय, तुम्ही नीट वाचले. आपल्याच देशात एक असा क्रिकेटर आहे जो सचिन, विराट आणि धोनीपेक्षा कितीतरी पटीने श्रीमंत आहे. आता या सगळ्यात श्रीमंत क्रिकेटरने 22 वर्षातच निवृत्ती घेतली आहे. या क्रिकेटरचे नाव आहे आर्यमन बिर्ला (aryaman birla) . कुमार मंगलम बिर्ला (Kumar Mangalam Birla) यांचा मुलगा आर्यमन बिर्लाने आता वडिलांचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी क्रिकेटला अलविदा केले आहे.

किती वर्ष खेळला क्रिकेट?

आर्यमन बिर्लाची क्रिकेट कारकीर्द केवळ दोन वर्षेच टिकली. या आधी २०१९ मध्ये त्याने मानसिक आरोग्याचे कारण देत क्रिकेटमधून ब्रेक घेतला होता. आता त्यानंतर त्याने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.  आर्यमानकडे एवढी संपत्ती आहे की तो स्वत:च एक आयपीएल संघ स्थापन करू शकतो.  2018 मध्ये त्याची राजस्थान रॉयल्सने आयपीएलसाठी निवड केली होती. पण दुर्दैवाने तो कधीही आयपीएल सामना खेळू शकला नाही.

हे ही वाचा: "तर पाकिस्तानच्या संघाने भारतात जावे आणि..." चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वादावरून शोएब अख्तरने टीम इंडियासाठी काढले वाईट उद्गार

जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू

२२ वर्षीय आर्यमन केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर आहे. आर्यमनची एकूण संपत्ती 70000 हजार कोटी रुपयांहून अधिक आहे. भारतातील दिग्ग्ज खेळाडू जसे कीसचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि धोनीसारख्या क्रिकेटपटूंची एकूण संपत्तीही या तरुण खेळाडूच्या संपत्तीच्या तुलनेत काहीच नाही. आजवर देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या आर्यमन बिर्लाला टीम इंडिया आणि आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळू शकली नाही. 

हे ही वाचा: IND vs AUS: क्रिकेट विश्वात शोककळा...भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेदरम्यान 'या' महान फलंदाजाचे निधन

कधी केली सुरुवात? 

एवढ्या मोठ्या कुटुंबातील सदस्य असूनही आर्यमन विक्रम बिर्लाने क्रिकेटमध्ये करिअर केले. त्याने 2017-18 मध्ये मध्य प्रदेशसाठी रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केले. त्याने  प्रथम श्रेणी क्रिकेटमधून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्याने पहिल्याच सामन्यात दमदार खेळी केली होती. नऊ सामन्यांच्या 16 डावात एक शतक आणि एक अर्धशतकांसह एकूण 414 धावा केल्या होत्या. कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर त्याने शतक झळकावले होते. या शतकामुळे त्याने बंगालला ड्रॉ खेळण्यास भाग पाडले.