साऊथम्पटन : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना (world test championship Final) टीम इंडिया (Team India) विरुद्ध न्यूझीलंड (New Zeland) यांच्यात खेळवण्यात येत आहे. या सामन्यात जोरदार बाऊन्सर पाहायला मिळत आहे. सामन्यादरम्यान न्यूझीलंडच्या नील वॅग्नरने (Neil Wagner) टाकलेला बाऊन्सर थेट चेतेश्वर पुजाराच्या (cheteshwar pujara) हेल्मटवर जाऊन आदळला. हा बाऊन्सर इतका जोरदार होता की पुजाराच्या हेल्मेटचा सेफ्टी गार्ड तुटला. (wtc final 2021 day 2 cheteshwar pujara narrowly escapes safety guard helmet broken on Neil Wagner bowling during 37 over)  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नक्की काय झालं? 


लचं ब्रेकनंतर कर्णधार विराट कोहली आणि पुजारा मैदानात उतरले. टीम इंडियाचा स्कोअर 2 बाद 69 होता. या दोघांनी स्कोअर कार्ड हलता ठेवण्याचा प्रयत्न केला. वॅग्नर सामन्यातील 37 वी ओव्हर टाकायला आला. या ओव्हरमधील दुसरा चेंडू शॉर्ट  ऑफ द लेंथ टाकली. पुजाराने या चेंडूवर पुल शॉट मारण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न फसला. त्यामुळे तो चेंडू थेट हेल्मेटच्या मागील बाजूस जाऊन आदळला. त्यामुळे हेल्मेटचा सेफ्टी गार्ड तुटला.



हा सर्व प्रकार पाहून टीम इंडियाचे वैद्यकीय पथकाने मैदानात धाव घेतली. पुजाराला कुठे दुखापत झालीये का, हे पाहिलं. पणसुदैवाने यात पुजाराला कोणतीही दुखापत झाली नाही. 


दरम्यान याआधी सामन्यातील 17 व्या ओव्हरमध्येही असाच प्रकार घडला.  कायले जेमिन्सनने या ओव्हरमधील चौथा बॉल शॉर्ट ऑफ लेंथ टाकला. समोर युवा शुबमन गिल खेळत होता. हा चेंडू थेट हेल्मेटवर जाऊन आपटला. पण सुदैवाने गिललाही कोणतीही दुखापत झाली नाही.


संबंधित बातम्या : 


WTC Final : न्यूझीलंडच्या या खेळाडूची अभिनेता संजय दत्तसोबत तुलना, पाहा काय आहे कारण


WTC Final | 8 धावांवर बाद झाल्यानंतरही 'या' फलंदाजाच्या नावे अनोखा विक्रम