WTC Final | 8 धावांवर बाद झाल्यानंतरही 'या' फलंदाजाच्या नावे अनोखा विक्रम

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशीपचा अंतिम सामना (ICC World Test Championship Final 2021) टीम इंडिया (Team India) विरुद्ध न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात साऊथम्पटनमध्ये (Southmpton) खेळवण्यात येत आहे. 

Updated: Jun 19, 2021, 07:46 PM IST
WTC Final | 8 धावांवर बाद झाल्यानंतरही 'या' फलंदाजाच्या नावे अनोखा विक्रम
साऊथम्पटन : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशीपचा अंतिम सामना (ICC World Test Championship Final 2021) टीम इंडिया (Team India) विरुद्ध न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात साऊथम्पटनमध्ये (Southmpton) खेळवण्यात येत आहे. न्यूझीलंडने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेत टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडले. रोहित शर्मा-शुबमन गिल या सलामीवीर जोडीने अर्धशतकी भागीदारी केली. मात्र त्यानंतर ही जोडी बाद झाली. यानंतर टेस्ट स्पेशालिस्ट चेतेश्वर पुजाराही (Cheteshwar Pujara) स्वस्तात आऊट झाला. मात्र यानंतरही पुजाराच्या नावे अनोख्या विक्रमाची नोंद झाली आहे. (world test championship final 2021 Test specialist Cheteshwar Pujara take his 1st run on 36th ball)
 
काय आहे विक्रम?
 
पुजाराने टीम इंडियाकडून पहिली धाव करण्यासाठी सर्वाधिक चेंडू खेळण्याचा विक्रम केला आहे. शुबमन गिलच्या रुपात भारताने दुसरी विकेट गमावल्यानंतर पुजारा चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी मैदानात आला. चांगल्या सुरुवातीनंतर भारताने झटपट 2 विकेट्स घेतल्या. त्यामुळे टीम इंडियाचा डाव सावरण्यासह मैदानात असलेल्या कर्णधार विराट कोहलीला साथ देण्याचे आव्हान पुजारासमोर होते.
 
त्यानुसार, पुजारा आपल्या नेहमीच्या पद्धतीने संयमाने खेळू लागला. पुजाराने पहिली धाव 36 व्या चेंडूवर काढली. पुजाराने चौकार ठोकत खातं उघडलं. कसोटी कारकिर्दीत पुजाराने दुसऱ्यांदा खातं उघडण्यासाठी 25 पेक्षा अधिक चेंडूचा सामना केला. याआधी पुजाराने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर धावांचं खातं उघडण्यासाठी तब्बल 53 चेंडूंचा सामना केला होता.
 
दरम्यान,  पुजाराने 54 चेंडूमध्ये 2 चौकारांच्या मदतीने  8 धावा केल्या. टेन्ट बोल्टने पुजाराला एलबीडबल्यू आऊट केलं. 
 
संबंधित बातम्या :