WTC Final : न्यूझीलंडच्या या खेळाडूची अभिनेता संजय दत्तसोबत तुलना, पाहा काय आहे कारण

भारतीय क्रिकेटप्रेमींनी या खेळाडूची तुलना बॉलिवूड स्टार संजय दत्तशी करण्यामागचं कारण काय? पाहा

Updated: Jun 19, 2021, 07:55 PM IST
WTC Final : न्यूझीलंडच्या या खेळाडूची अभिनेता संजय दत्तसोबत तुलना, पाहा काय आहे कारण

मुंबई : भारतीय क्रिकेट संघ (Team India) आणि न्यूझीलंड क्रिकेट संघ (Team New Zealand) यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (ICC World Test Champinship) विजेतेपदासाठी इंग्लंडमध्ये सामना सुरु आहे. हा सामना इंग्लंडच्या साऊथॅम्प्टनमधील एजेस बाउल स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने आधी फिल्डिंगचा निर्णय घेतला. पहिल्या दिवशी पावसामुळे हा सामना सुरु होऊ शकला नाही. त्यामुळे दुसर्‍या दिवशी म्हणजेच आज सामना सुरु झाला. टीम इंडियासमोर न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज कॉलिन डी ग्रँडहोम ( Colin De Grandhomme ) गोलंदाजीसाठी आला आणि सोशल मीडियावर त्याची तुलना संजय दत्तशी केली जावू लागली.

भारतीय क्रिकेटप्रेमींनी या खेळाडूची तुलना बॉलिवूड स्टार संजय दत्तशी करण्यामागचं कारण म्हणजे ग्रँडहोमची हेअरस्टाईल. ग्रँडहॉमची हेअरस्टाईल 90 च्या दशकात संजय दत्तच्या  स्टाईल सारखीच आहे.

ग्रँडहोम याचा जन्म झिम्बाब्वेमध्ये झाला होता. पण तो न्यूझीलंडकडून तीनही स्वरूपात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतो. 34 वर्षीय ग्रँडहोम याने 26 कसोटी, 42 एकदिवसीय आणि 36 टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने आयपीएलचे 25 सामनेही खेळले आहेत.

ग्रँडहोमने आज लंचटाईमपर्यंत ४ ओव्हरमध्ये १५ धावा दिल्या. एक मेडन ओव्हर देखील टाकली.

भारतीय संघ : शुभमन गिल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, Rषभ पंत (डब्ल्यूके), रवींद्र जडेजा, आर अश्विन, मोहम्मद सिराज / इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी.

न्यूझीलंड संघ : टॉम लाथम, डेव्हन कॉनवे, केन विल्यमसन (क), रॉस टेलर, हेन्री निकॉल्स, बी.जे. वॅटलिंग (डब्ल्यूके), कॉलिन डी ग्रँडहॉम, काईल जेमीसन, नील वॅग्नर, टिम साउथी, ट्रेंट बोल्ट