Auto News: भारतात `या` टॉप 10 गाड्यांना सर्वाधिक मागणी, आकडेवारी आली समोर
मारुती अल्टो रेंजमध्ये अल्टो 800 आणि अल्टो के10 अशी दोन मॉडेल्स आहेत. अल्टो 800 ची किंमत 3.39 लाख ते 5.03 लाख रुपये आणि अल्टो K10 ची किंमत 3.99 लाख ते 5.84 लाख रुपये आहे.
Top 10 Selling Cars In India: भारतात दर महिन्याला कार विक्रीची आकडेवारी समोर येते. नुकतंच सप्टेंबर महिन्यातील विक्रीचे आकडे जाहीर करण्यात आले आहेत. कोणत्या कंपनीने किती गाड्यांची विक्री केली आहे, यावरून स्पष्ट होते. सप्टेंबर महिन्यात देशात विकल्या गेलेल्या टॉप-10 कारची यादी समोर आली आहे. या आकडेवारीत मारुती सुझुकी अल्टो पहिल्या क्रमांकावर आहे. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात मारुती सुझुकी बलेनो पहिल्या स्थानावर होती. मारुती अल्टोचे सप्टेंबर 2022 मध्ये 24,844 युनिट्स विकले गेलेत.
सप्टेंबरमधील कार विक्री
1- मारुती सुझुकी अल्टो- 24,844 युनिट्स
2- मारुती सुझुकी वॅगनआर - 20,078 युनिट्स
3- मारुती सुझुकी बलेनो- 19,369 युनिट्स विकल्या
4- मारुती सुझुकी ब्रेझा - 15,445 युनिट्स
5- टाटा नेक्सॉन - 14,518 युनिट्स
6- ह्युंदाई क्रेटा- 12,866 युनिट्स
7- मारुती सुझुकी इको- 12,697 युनिट्स
8- टाटा पंच - 12,251 युनिट्स
9- मारुती सुझुकी स्विफ्ट- 11,988 युनिट्स
10- ह्युंदाई वेन्यू- 11,033 युनिट्स
Maruti Suzuki Festive Offer: कार घेताय! 'Maruti Suzuki' कार्सवर मिळतोय बंपर डिस्काऊंट
मारुती अल्टो रेंजमध्ये अल्टो 800 आणि अल्टो के10 अशी दोन मॉडेल्स आहेत. अल्टो 800 ची किंमत 3.39 लाख ते 5.03 लाख रुपये आणि अल्टो K10 ची किंमत 3.99 लाख ते 5.84 लाख रुपये आहे. या किंमती एक्स-शोरूम, दिल्ली आहेत. अल्टो 800 मध्ये BS6 नॉर्म्ससह 0.8-लिटर, 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे. हे पेट्रोलवर 48 पीएस पॉवर आणि 69 एनएम टॉर्क देते, तर सीएनजीवर 41 पीएस पॉवर आणि 60 एनएम टॉर्क देते. यात 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन (MT) मिळते.
अल्टो K10 मध्ये 1.0-लिटर पेट्रोल इंजिन उपलब्ध आहे. हे 67 पीएस पॉवर आणि 89 एनएम टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. हे 5-स्पीड मॅन्युअल (स्टँडर्ड) आणि AMT गिअरबॉक्स (ऑप्शनल) सह उपलब्ध आहे.