Maruti Suzuki Festive Offer: कार घेताय! 'Maruti Suzuki' कार्सवर मिळतोय बंपर डिस्काऊंट

मुंबई : इंडियन ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये 2022 फेस्टिव सीझनदरम्यान कार खरेदी करणाऱ्यांसाठी उत्तम दर्जाच्या अनेक ऑफर्स Maruti Suzuki कंपनीकडून दिल्या जात आहेत. या ऑफर्सच्या माध्यमातून तुम्ही 40 हजार रुपयांपर्यंतची सूट मिळवू शकता. Maruti Suzuki कंपनीच्या कोणत्या कार्सवर या ऑफर्स सुरु आहेत. याबद्दल जाणून घ्या....

Oct 05, 2022, 14:09 PM IST
1/5

Maruti Suzuki WagonR

Maruti WagonR (Manual आणि AMT) वर 31,000 रुपयांपर्यंत सूट आहे. या कारचं बेस मॉडेल 15,000 रुपयांच्या सवलतीत उपलब्ध आहे. त्यासोबतच, रेंज-टॉपिंग प्रकार 5,000 रुपयांच्या सवलतीसह उपलब्ध आहेत. WagonR सध्या 1.0L आणि 1.2L DualJet, ड्युअल VVT पेट्रोल इंजिनसह खरेदी करता येते. याशिवाय, ही कार CNG इंजिनच्या पर्यायमध्ये देखील खरेदी करता येते.

2/5

Maruti Suzuki Alto 800

मारुती सुझुकी अल्टो 800 वर 36,000 रुपयांची सूट (फक्त टॉप व्हेरिएंट) मिळू शकते. त्याच वेळी, या हॅचबॅकच्या खालच्या वेरिएंटवर 11,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. या कारचं इंजिन 796cc, 3-सिलेंडर पेट्रोल असून, ते 22.74kmpl मायलेज देतं. या कारचं CNG मॉडेल 30.46 किमी/किलो मायलेज देतं.

3/5

Maruti Suzuki Alto K10

Alto K10 वर 39,500 रुपयांपर्यंत सूट आणि फायदे उपलब्ध आहेत. त्याच्या डिस्काउंट ब्रेकअपमध्ये 17,500 रुपयांची रोख सवलत, 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 7,000 रुपयांचा कॉर्पोरेट लाभ यांचा समावेश आहे. मारुती अल्टो K10 मध्ये 1.0L K10C पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे 67bhp पॉवर जनरेट करते.

4/5

Maruti Suzuki Swift

मारुती स्विफ्ट 47,000 रुपयांपर्यंतच्या सूटसह उपलब्ध आहे (केवळ अॅटोमॅटिक प्रकार). त्याच वेळी, या हॅचबॅकच्या मॅन्युअल प्रकारावर 47,000 रुपयांचा फायदा मिळू शकतो. स्विफ्टमध्ये 1.2L Dualjet पेट्रोल इंजिन आणि 5-स्पीड मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्स पर्याय आहेत.

5/5

Maruti Suzuki Celerio

नवीन Celerio च्या मॅन्युअल वेरिएंटवर 51,000 रुपयांपर्यंतचा फायदा दिला जात आहे. यामध्ये 30,000 रुपयांची रोख सूट, 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 6,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट समाविष्ट आहे. Celerio AMT आणि CNG व्हर्जनवर 41,000 आणि 10,000 रुपयांची सूट दिली जाऊ शकते. हा हॅचबॅक 1.0L पेट्रोल मोटरसह येतो.