Hyundai Exter Easy Loan EMI Down Payment: स्वत:ची कार घेण्याच्या विचारात असाल तर, सर्वप्रथम काही गोष्टी लक्षात ठेवा. तुमचा पगार, कर्ज मिळण्याची आणि ते फेडण्याची क्षमता, तुमच्याकडे डाऊनपेमेंटसाठी तयार असणारी रक्कम आणि अर्थातच कार पार्किंगसाठी जागा. कार खरेदी करणं कितीही सोपं असलं तरीही, ती कार खरेदी करण्यासाठीची प्रक्रिया मात्र तुम्हाला बऱ्याच मुद्द्यांवर विचार करायला भाग पाडते. त्यातलीच एक महत्त्वाची बाब असते ती म्हणजे Down Payment ची. आता मात्र तुम्हाला त्याचीही फारशी चिंता करण्याची गरज नाही. 


ह्युंडईच्या मॉडेलचा धुमाकूळ 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकत्याच लाँच झालेल्या ह्युंडई एक्सटरच्या मॉडेलनं ऑटो क्षेत्रात लांच होताक्षणी इतर सर्वच कार मागे पडल्या आहेत. भारतीय मार्केटमध्ये एक्सटरचे EX, S, SX, SX (O) आणि SX (O) Connect असे मॉडेल लाँच करण्यात आले आहेत. साधारण 6 लाखांपासून या कारच्या बेस मॉडेलची सुरुवात होते तर, तिचं टॉप मॉडेल 10.10 लाखांच्या घरात जातं. पेट्रोल आणि सीएनजी अशा दोन्ही इंधन पर्यायांमध्ये ही कार उपलब्ध असून, ती 19.4 kmpl (पेट्रोल), 27.1 km/kg (सीएनजी) इतकं मायलेज देते. 


एक्सटरचे फिचर्स 


6 एअरबॅग्ज, ड्युअल कॅमेरा असणारा डॅशकॅम, वॉईस कमांड सनरुफ असे फिचर्स कारमध्ये देण्यात आले आहेत. या कारच्या सर्वात स्वस्त ऑटोमॅटिक व्हेरिएंटच्या पेट्रोल व्हर्जनची एक्स शोरूम किंमत  7,96,980 रुपये आणि ऑन-रोड प्राइस 9,03,253 रुपये इतकी आहे. 1 लाख रुपयाच्या डाऊनपेमेंटसह Loan वर तुम्ही ही कार खरेदी करु इच्छिता तर तुम्ही साधारण  8,03,253 रुपये कर्ज घेणं अपेक्षित आहे. 5 वर्षांसाठीच्या या कर्जासाठी 9 टक्के व्याजदरानं तुम्ही दर महिना 16,674 रुपये इतका हप्ता दर महिन्याला भरणं अपेक्षित असेल. 


हेसुद्धा वाचा : Raksha bandhan Gift : रक्षाबंधनानिमित्त लाडक्या बहिणीला द्या देखणा दागिना; नथ, कुडी आणि बरंच काही... 


ह्युंडई एक्सटर एसएक्स ऑटोमॅटिकविषयी सांगावं तर, त्याची एक्स शोरुम किंमत 8.68 लाख रुपये असून, ऑनरोड किंमत 9,81,765 रुपये इतकी आहे. या कारच्या पेट्रोल मॉडेलवर तुम्ही जर 1 लाखांचं डाऊन पेमेंट करता तर तुम्हाला 8,81,765  रुपयांचं कर्ज घ्यावं लागेल. इथं 9 टक्क्यांच्या व्याजदरानं 5 वर्षांच्या काळासाठी कर्ज घेतल्यास दर महिन्याला तुम्हाला 18,304 कर्जाचा हप्ता भरावा लागू शकतो. त्यामुळं खर्चाची ही गणितं पाहून आता तुम्हाला नेमकी कोणती कार खरेदी करायचीये आणि तिच्या कर्जाची विभागणी कशी करायचीये हे लगेचच ठरवा.