रक्षाबंधनानिमित्त लाडक्या बहिणीला द्या देखणा दागिना; नथ, कुडी आणि बरंच काही...
Raksha bandhan Gift : काही बहिणी त्यांचे भाऊ आता नेमकी काय भेट देणार यासाठी उत्सुक असून, Surprise ची वाट पाहत आहेत. तर, ही माहिती त्या सर्वच भावांसाठी जे रक्षाबंधनच्या निमित्तानं बहिणींना छानशी भेट देऊ इच्छितात.
Raksha bandhan Gift : रक्षाबंधनाचा दिवस उजाडण्याआधीच समस्त भगिनी मंडळाकडून अर्थात बहिणींकडून भावापुढं भेटवस्तूंची यादीच सादर करण्यात आली असेल. मला अमुक ब्रँडची पर्स, तमुक ब्रँडचा परफ्युम, एखादं गिफ्ट वाऊचर किंवा मग अगदीच नाही तर कुठंतरी बाहेर जाण्यासाठीची तिकीटं हे असं सुरुच असेल.