BSNL सध्या खुप चर्चेत आहे. कारण ही कंपनी खुपच स्वस्त आणि युजर फ्रेंडली रिचार्ज प्लॅन आणत आहे. एकीकडे जियो, एअरटेल आणि आयडियासारख्या कंपन्यांच्या जुन्या प्लॅन्सच्या किंमती वाढत आहेत. असं असताना BSNL चे स्वस्त आणि जास्त व्हॅलेडिटीचे प्लॅन लोकांना आकर्षित करत आहेत. BSNL या सरकारी कंपनीने 45 दिवसांचा एक नवीन रिचार्ज प्लॅन आणला आहे. हा प्लॅन इतर कंपनींच्या प्लान्सच्या तुलनेत जास्त चांगला असल्याने BSNL च्या ग्राहकांचा फायदा होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरीकडे जियो, एअरटेल, आयडियासारख्या कंपनी आपल्या जुन्या प्लॅन्सच्या किंमती वाढवत आहेत. हे रिचार्ज प्लॅन फक्त 28 किंवा 30 दिवसांपर्यंतच चालतात. पण BSNL चा हा नवीन रिचार्ज प्लॅन 45 दिवसांपर्यत चालतो आणि महत्त्वाचं म्हणजे त्याची किंमतही कमी आहे. त्यामुळे अनेक यूजरर्स BSNL मध्ये आपला नंबर पोर्ट करत आहेत. या रिचार्ज प्लॅनच्या माध्यमातून BSNL आपले ग्राहक वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांचे 4G नेटवर्कही अनेक ठिकाणी वाढत आहे. त्यामुळे लोकांनी BSNL मध्ये पोर्ट करण्याचं हेही एक महत्त्वाचं कारण आहे.  


BSNL Plan Rs. 249


अनेकदा आपण वापरत असलेल्या नेटवर्क बद्दल आपल्याला बऱ्याच तक्रारी असतात. मग त्या नेटवर्कच्या संर्दभात असतील किंवा किंमत, व्हॅलेडिटी, डेटाच्या बाबतीत, त्यामुळे आपल्याला नेहमी एक चांगले नेटवर्क हवे असते. सध्या BSNL आणलेला हा रिचार्ज प्लॅन किंमतीने कमी असल्याने ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. याशिवाय हा प्लान 45 दिवसांसाठी आहे आणि यात तुम्हाला 90GB डेटा मिळणार आहे. म्हणजे रोच 2GB डेटा ग्राहकांना मिळेल. हा प्लॅन खुपच फायद्याचा आहे, विशेषतः जे लोक रोज जास्त डेटा वापरतात त्यांच्यासाठी हे खुप फायद्याचे आहे. 


हेही वाचा : वर्षभराच्या मुलानं खेळता खेळता गिळली व्हिक्सची डबी; डॉक्टरही हादरले आणि मग...


 


हा रिचार्ज प्लॅन फक्त नवीन ग्राहकांसाठीच


लक्षात घ्या की 249 किंमतीचा हा प्लॅन फक्त नवीन ग्राहकांसाठीच आहे. म्हणजे जे यूजर्स पहिल्यांदा BSNL मध्ये येत आहेत त्यांच्यासाठीच. तुम्ही जर इतर कोणते नेटवर्क सोडून BSNL मध्ये येत असाल तर हा रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठीच आहे आणि या प्लॅनमुळे तुमचा फायदाही होणार आहे. कारण याची व्हॅलिडिटी, डेटा आणि कॉलिंग सगळ्याचेच चांगले फायदे आहेत. जिओ नेटवर्कने सुद्धा सुरूवातील लोकांना असेच स्वस्त प्लॅन्स आणि वेगवेगळ्या सुविधा देऊन लोकांना आपल्याकडे आकर्षित केले होते आणि मोठ्या प्रमाणात यूजर्सने जिओमध्ये आपले नंबर पोर्टही केले होते. पण आता मात्र जिओ कंपनीने आपल्या प्लॅन्सच्या किंमती चांगल्याच वाढवल्या आहेत. यानंतर आता BSNL ही जिओसारखेच लोकांना आकर्षित करत आहे का? आणि काही काळानंतर BSNL ही आपल्या प्लान्सच्या किंमती वाढवणार का? असा प्रश्न सध्या ग्राहकांना पडला आहे.