मुंबई : ऱिलायन्स जिओ बाजारात आल्यानंतर टेलिकॉम कंपन्या ग्राहकांसाठी नवे नवे प्लान लाँच करतायत. कंपन्यांकडून सातत्याने नवनव्या ऑफर दिल्या जात आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिओने नोव्हेंबरमध्ये आपल्या यूझर्ससाठी खास कॅशबॅक ऑफर आणली होती. या ऑफरची अखेरची तारीख २५ नोव्हेंबर होती. यानंतर कंपनीने या ऑफरची अखेरची तारीख १५ डिसेंबरपर्यंत वाढवली. या ऑफरम्ये कंपनीने ३९९ आणि त्याहून अधिक रुपयांच्या रिचार्जवर २५९९ रुपयांपर्यंत कॅशबॅक ऑफर दिलीये. रिचार्जची ही ऑफर केवळ ऑनलाईन रिचार्ज केल्यावरच मिळतेय.


हा आहे प्लान


जर तुम्ही जिओचे ३९९ रुपयांचे रिचार्ज करता तर यावर तुम्हाला ४०० रुपयांचा कॅशबॅक मिळतो. यात तुम्हाला ५०-५० रुपयांचे ८ वाऊचर मिळतात. ३९९ रुपयांचा रिचार्ज केल्यानंतर पुढील ८ रिचार्जनर तुम्हाला प्रत्येकी ५० रुपयांचा डिस्काऊंट मिळतो. याचाच अर्थ ३९९ रुपयांचा रिचार्ज तुम्हाला ३४९ रुपयांना मिळेल. हे ४०० रुपये जिओ अॅपमध्ये मिळतील. ३०० रुपये मोबाईल वॉलेटमध्ये आणि बाकी उरलेल्या पैशांचे शॉपिंग वाऊचर मिळतील. 


मोबिक्विकवर ही ऑफर 


नव्या आणि जुन्या यूझर्ससाटी मोबिक्विकवर ही ऑफर मिळतेय. मोबिक्विकद्वारे नव्या यूझर्सनी ३९९ रुपयांच्या रिचार्ज करताना NEWJIO कोड टाकल्यास ३०० रुपयांचा कॅशबॅक मिळतो. तर जुन्या यूझर्सना JIO149 हा कोड टाकावा लागेल. जुन्या यूझर्सना १४९ रुपयांचा कॅशबॅक मिळेल. 


अॅमेझॉन-पे, पेटीएमनेही कॅशबॅक


अॅमेझॉन-पे वरुन ३९९ रुपयांच्या रिचार्जवर नव्या यूझर्सना ९९ रुपयांचा कॅशबॅक मिळेल आणि जुन्या यूझर्सना २० रुपयांचा कॅशबॅक मिळेल. पेटीएमद्वारे जिओचे ३९९ रुपयांचे रिचार्ज करताना नव्या यूझर्सनी NEWJIO हा कोड टाकल्यास ५० रुपयांचा कॅशबॅक मिळेल. याशिवाय जुन्या यूझर्सनी PAYTMJIO कोड टाकल्यास १५ रुपयांचा कॅशबॅक मिळेल.