Kia Cars: देशात किया कंपनीच्या गाड्यांना मोठी मागणी, कारचा वेटिंग पिरियड आणि किंमत जाणून घ्या
Kia Car Demands: भारत हे जगभरातील ऑटो कंपन्यांसाठी मोठी बाजारपेठ आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या त्यानुसार आपल्या गाड्या सादर करत असते. गेल्या काही वर्षात दक्षिण कोरियाची कार कंपनी कियाने आपली घट्ट मुळं रोवली आहेत. या कंपनीच्या गाड्यांच्या प्रतीक्षा कालावधीवरूनच याबाबतचा अंदाज येतो.
Kia Car Demands: भारत हे जगभरातील ऑटो कंपन्यांसाठी मोठी बाजारपेठ आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या त्यानुसार आपल्या गाड्या सादर करत असते. गेल्या काही वर्षात दक्षिण कोरियाची कार कंपनी कियाने आपली घट्ट मुळं रोवली आहेत. या कंपनीच्या गाड्यांच्या प्रतीक्षा कालावधीवरूनच याबाबतचा अंदाज येतो. तुम्ही देखील किया कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण प्रतीक्षा कालावधी आणि किंमत पाहून गाडी बूक करणं तुम्हाला सोपं होईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीकडून भारतात एकूण पाच कारची विक्री होते. या सर्व गाड्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेमुळे ग्राहकांना डिलिव्हरी मिळण्यास वेळ लागत आहे.
गाड्यांसाठी प्रतीक्षा कालावधी
कियाने बजेट एमपीव्ही सेगमेंटमध्ये कॅरेन्स (Carens) कार येते. तसेच लक्झरी फॅमिली कार म्हणून कार्निव्हलसारखी (Kia Carnival) आलिशान कार देखील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या दोन्ही एमपीव्ही कारचं बुकिंग केल्यानंतर, डिलिव्हरीसाठी सुमारे तीन महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी असेल. एमपीव्ही व्यतिरिक्त, कंपनी कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये सोनेट (Sonet) आणि मध्यम आकाराची एसयूव्ही म्हणून सेल्टोस (Seltos) ऑफर करते. सोनेट आणि सेल्टोस खरेदी करायचे आहे त्यांना बुकिंगनंतर सुमारे चार महिने प्रतीक्षा करावी लागू शकते. दुसरीकडे, कंपनीच्या एकमेव इलेक्ट्रिक कार EV 6 ला देखील भारतात मोठा प्रतिसाद मिळाला आहे. मात्र या कारसाठी प्रतीक्षा कालावधी माहिती नाही.
बातमी वाचा- Video: नवं कोरं हेलिकॉप्टर घेऊन उद्योगपती थेट मंदिरात, तीन पुजाऱ्यांनी केली विधीवत पूजा
किंमत किती आहे
किया कारच्या किंमतीबद्दल बोलायचे तर, सोनेटची एक्स-शोरूम किंमत 7.49 लाख रुपयांपासून सुरू होते. सेल्टोसची एक्स-शोरूम किंमत 10.49 लाख रुपयांपासून सुरू होते. कॅरेन्सची एक्स-शोरूम किंमत 9.99 लाख रुपये आणि कार्निव्हल एक्स-शोरूम किंमत 30.99 लाख रुपये पासून सुरू होते. कंपनीच्या एकमेव इलेक्ट्रिक कार EV6 ची एक्स-शोरूम किंमत 59.95 लाख रुपयांपासून सुरू होते. दुसरीकडे, नवीन वर्षात कारच्या किमती वाढणार असल्याची माहिती कंपनीकडून आधीच देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी नवीन वर्षापासून आपल्या सर्व कारच्या किमती सुमारे 50 हजार रुपयांनी वाढवण्याच्या तयारीत आहे.