Helicopter Vahan Puja: भारतात कोणतीही नवी वस्तू घेतली की पूजा करण्याची परंपरा आहे. मग ते वाहन असो की, टीव्ही फ्रीज..दुचाकी किंवा चारचाकी घेतल्यानंतर मंदिरात पूजेसाठी गाडी आणणं सामान्य गोष्ट आहे. पण तेलंगाणातील एका उद्योगपतीनं हेलिकॉप्टर विकत घेतल्यानंतर पूजा करण्यासाठी मंदिरात आणलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. भारतातील सर्वात वेगाने उभारी घेणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी प्रतिमा ग्रुपचे मालक बोयनापल्ली श्रीनिवास राव यांनी हेलिकॉप्टर विकत घेतले आणि पूजेसाठी मंदिरात नेले. विशेष पूजेसाठी ACH-135 हेलिकॉप्टर हैदराबादपासून सुमारे 100 किमी अंतरावर असलेल्या यदाद्री येथील श्री लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिरात आणले. प्रवासादरम्यान हेलिकॉप्टरमध्ये त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीयही होते. पुजेला बिझनेसमन आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. मंदिरातील तीन पुजाऱ्यांनी पूजा केली.
हेलिकॉप्टरची किंमत 5.7 मिलियन डॉलर म्हणजेच 47 कोटी रुपये आहे. हेलिकॉप्टरच्या पूजेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून युजर्स या व्हिडीओखाली आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत. एअरबस वेबसाइटनुसार, वजनाने हलकं असलेलं रोटरक्राफ्ट आहे.
Boinpally Srinivas Rao, the proprietor of the Prathima business, bought an Airbus ACH 135 and used it for the "Vahan" puja at the Yadadri temple dedicated to Sri Lakshmi Narasimha Swamy. Costing $5.7M, the opulent helicopter. #Telangana pic.twitter.com/igFHMlEKiY
— Mohd Lateef Babla (@lateefbabla) December 15, 2022
बातमी वाचा- FIFA World Cup फायनलमध्ये अर्जेंटिनाने धडक मारताच सोशल मीडियावर SBI पासबूक व्हायरल, कारण...
H135 टिकाऊपणा, कॉम्पॅक्ट बिल्ड, कमी आवाज, विश्वासार्हताआणि किंमत याबाबतीत वरचढ आहे. यात ट्विन इंजिन आहे. ऑपरेटिंग आणि देखभाल खर्च देखील कमी आहे. हे विविध मोहिमा पार पाडू शकते आणि जमिनीवर कुठेही उतरू शकते. इतर हेलिकॉप्टरच्या तुलनेत जास्त अंतरापर्यंत पेलोड वाहून नेण्याची क्षमता आहे. हेलिकॉप्टरच्या पूजेसाठी महाराष्ट्राचे माजी राज्यपाल विद्यासागर राव उपस्थित होते. विद्यासागर राव श्रीनिवास राव यांचे नातेवाईक आहेत. प्रतिमा ग्रुपचा विस्तार इन्फ्रास्ट्रक्चर, एनर्जी, मॅन्युफॅक्चरिंग, टेलिकॉम सेक्टरमध्ये आहे. प्रतिमा ग्रुपचं एक मेडिकल कॉलेज देखील आहे. तसेच अनेक रुग्णालयं आहेत.