फक्त 7.50 रुपयांत 100 Km फिरा! आपर्यंतची सर्वात जास्त मायलेज देणारी स्कूटर लाँच, किंमत एकदम स्वस्त
सर्वात जास्त मायलेज देणारी सर्वात स्वस्त स्कूटर लाँच झाली आहे. ही स्कूटर 7.50 रुपयांत 100 Km इतका मायलेज देते.
Zelio X-Men 2.0: अनेकजण फिचरसह वाहनाच्या मायलेजवर जास्त फोकस करतात. मग ती फोर व्हिलर असो की टू व्हीलर. बेजट व्हेईकलला ग्राहकांची पहिली पसंती असते. अशीच एक आजपर्यंतची सर्वात स्कूटर लाँच झाली आहे. इलेक्ट्रिक टू-व्हीलर उत्पादक ZELIO Ebike आपली इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. चार्जिंग युनीटचा हिशेब केला असता ही स्कूटर फक्त 7.50 रुपयांत 100 Km इतका मायलेज देते असा दावा कंपनीने केला आहे.
हे देखील वाचा... मुंबईच्या गर्दीत दडलेलं छुप हिल स्टेशन, फिरताना येतो माथेरान, महाबळेश्वरचा फिल... इथं जाणारा मार्ग आहे मुंबई बाहेरुन
इलेक्ट्रिक टू-व्हीलर उत्पादक ZELIO Ebikes ने आज अधिकृतपणे आपली नवीन लो-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर X-MEN 2.0 भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. कंपनीच्या प्रसिद्ध इलेक्ट्रिक स्कूटर X-Men मालिकेची ही अपग्रेडेड व्हर्जन आहे. X-Men स्कूटरच्या या अपग्रडेट व्हर्जनमध्ये काही नवीन फिचर्स आणि टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. यामुळे हे अपडेटे मॉडेल बेस्ट ठरणार आहे. आकर्षक लुकसह यात जबरदस्त बॅटरी पॅक देण्यात आला.
हे देखील वाचा... महाराष्ट्रातील एकमेव गाव जिथे घराबाहेर पार्क केलेल्या असतात होड्या; पाण्यात दडलेलं कोकणातील छुपं बेट
सामान्य लोकांच्या रोजच्या प्रवासाच्या गरजा विचारात घेऊन ही स्कूटर लाँच करण्यात आली आहे. शाळा-कॉलेजचे विद्यार्थी, ऑफिसला जाणारे किंवा शहरातील प्रवासी यांना लक्षात घेऊन कंपनीने ही स्कूटर डिझाईन केली आहे. कंपनीने ही स्कूटर लीड-ऍसिड आणि लिथियम-आयन बॅटरी पॅकसह चार वेगवेगळ्या प्रकारांमध्ये ही स्कूटर लाँच करण्यात आली आहे.
हे देखील वाचा... महाराष्ट्रातील हनीमून स्पेशल स्पॉट! कमी बजेटमध्ये बेस्ट ट्रीप, बेंगलोर, गोवा आणि काश्मिरला देतात टक्कर
Zelio X-Men 2.0 स्कूटरमध्ये 60/72V क्षमतेची BLDC इलेक्ट्रिक मोटर आहे. ही स्कूटर एका चार्जवर जास्तीत जास्त 100 किमी ड्रायव्हिंग रेंज देते. या स्कूटरचाटॉप-स्पीड 25 किमी/तास असा दावा कंपनीने केला आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी पूर्णपणे चार्ज करण्यासाठी जास्तीत जास्त 1.5 युनिट वीज वापरली जाते. दिल्ली शहराचे उदाहरण देत कंपनीने यासाठी लागणारा वीज बिलाच्या खर्चाचा तपशील दिला आहे. स्कूटर चार्जकरण्यासाठी 0-200 युनिट लागतात. दिल्लीत विजेसाठी अंदाजे 3 रुपये ते 4.16 रुपये प्रति युनिट शुल्क आकारले जाते. प्रति युनिट सरासरी 5 रुपये जरी गृहीत धरले तरी 1.5 युनिट विजेसाठी जास्तीत जास्त 7.5 रुपये खर्च होतील असा हिशेब कंपनीने मांडला आहे. म्हणजेच फक्त साडेसात रुपयांमध्येअंदाजे 100 किमीच्या ड्रायव्हिंग रेंजचा लाभ घेता येणार आहे. लिथियम बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 4 ते 5 तास लागतात आणि लीड-ऍसिड बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी सुमारे 8 ते 10 तास लागतात. 90 किलो वजनाच्या या इलेक्ट्रिक स्कूटर क्षमता 180 किलोपर्यंत वजन वाहून नेण्याची आहे. या स्कूटरवक दोन व्यक्ती सहज प्रवास करू शकतात. या या स्कूटरची स्टार्टिंग प्राईज 71,500 रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे.