Adani Group Hindenburg Report : हिंडनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर (hindenburg report) गौतम अदानींच्या (Gautam Adani) अडचणी वाढल्याचं चित्र दिसत आहे. गौतम अदानींच्या कंपन्यांच्या शेअर्सचे (adani group share) भाव पडले आहेत. अनेक कंपन्यांच्या शेअर्सला तर लोअर सर्किट लागलं आहे. दरम्यान गौतम अदानींची कंपनी अदानी पोर्ट्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या सिंगापूरमधील कंपनीने एक महत्त्वाचं विधान केलं आहे. सिंगापुरमधील गुंतवणूकदार टेमासेक होल्डिंग्स (प्रायव्हेट) लिमिटेडने (Temasek Singapore) अदानी पोर्ट्स (Adani Ports) अॅण्ड स्पेशल इकॉनमिक झोनमधील आपली गुंतवणूक कायम ठेवणार आहे, असं स्पष्ट केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेमधील फॉरेन्सिक संशोधनासंदर्भातील संस्थेने अदानी समुहावर फसवणुकीचा आरोप केला असून सातत्याने या भारतीय कंपनीला लक्ष्य केलं आहे. 'द स्ट्रेट्स टाइम्स'ने सोमवारी सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीच्या प्रवक्त्यांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार 'अदानी पोर्ट्स'मध्ये गुंतवणूक कायम ठेवणार आहे. डिसेंबर 2022 पर्यंत टेमासेक कंपनीकडे 496.59 अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या किंमतीची संपत्ती होती.


टेमासेकच्या मालकीच्या कॅमस इनव्हेस्टमेंट्सच्या माध्यमातून अदानी पोर्ट्समध्ये 1.2 टक्क्यांहून थोडी अधिक हिस्सा विकत घेतला होती. टेमासेकने हा करार 2018 साली 14.7 कोटी सिंगापुरी डॉलर्सला केला होता. अदानी समूहाच्या अदानी विल्मरच्या माध्यमातून ही कंपनी खाद्यतेल आणि खाद्य उद्योगामध्येही सक्रीय आहे. या क्षेत्रामध्ये कंपनीचं सिंगापूरमधील लिस्टेड कंपनी असलेल्या विल्मर इंटरनॅशनलबरोबर संयुक्त उद्योग व्यवसाय आहे. हिंडनबर्ग रिसर्चने अदानी ग्रुपवर फसवणुकीचा आरोप केला आहे. यानंतर अदानी समुहाच्या शेअर्सची किंमत मोठ्या प्रमाणात पडली आहे.


सोमवारी म्हणजेच 30 जानेवारी 2023 रोजी अदानी पोर्ट्सच्या शेअर्समध्ये पडझड झाली. नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये शेअर 620 रुपयांच्या दरावर होता. दुपारी दीड वाजता त्याची किंमत 580 रुपयांपर्यंत घसरली. याशिवाय अदानी समुहाच्या इतर कंपन्यांचे शेअर्सही पडले आहेत.