भारताविरोधात ट्विट केल्याने पाकिस्तानी नेते सोशल मीडियावर ट्रोल
भारतावर टीका करताना ट्विटरवर घोडचूक
नवी दिल्ली : सध्या प्रत्येक पाकिस्तानी नेता भारताविरोधात गरळ ओकण्याची एकही संधी सोडत नाहीए. पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री आमि सध्याचे पाकिस्तानी सिनेट कमिटी सदस्य रहमान मलिक यांनी तर भारतावर टीका करताना ट्विटरवर एक मोठी घोडचूक केली आणि स्वत:चं चांगलंच हसू करून घेतलं. ज्यामुळे ते सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल झाले.
काश्मीरवरून परत पाठवलेल्या भारतीय नेत्यांच्या बातमीवर प्रतिक्रिया देताना रहमान मलिक यांना ट्विटरवर पंतप्रधान मोदी आणि संयुक्त राष्ट्राला टॅग करायचे होते, त्यांनी UN ऐवजी @REALUNOGAMES असं टॅग केलं... आणि यावरून ते चांगलेच ट्रोल झाले. उनो हा पत्त्यांच्या खेळांचा एक प्रकार असून लहान मुलांचा एक आवडता खेळ आहे.
ट्रोल झाल्यानंतर त्यांनी यावर प्रतिक्रिया देखील देखील.