Rishi Sunak UK Prime Minister : ऋषी सुनक.. ब्रिटनचे नवे पंतप्रधान.. ऋषी सुनक यांच्या रुपात ब्रिटनला सर्वात तरूण आणि पहिलाच मूळ भारतीय वंशाचा पंतप्रधान लाभला आहे. पण सुनक यांना ते भारतीय वंशाचे आणि धर्माने हिंदू असल्याचा जाज्वल्य अभिमान आहे, तसं त्यांनी स्वत:च सांगितलंय. फक्त बोलून ते थांबले नाहीत तर 28 ऑक्टोबरला सुनक पंतप्रधानपदाची शपथ ते भगवद्गीतेवर हात ठेवून घेणार असल्याचं समजतंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यापूर्वी सुनक जेव्हा पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले होते तेव्हाही त्यांनी गीतेवर हात ठेवून शपथ घेतली होती, इतकच नाही तर पहिल्यांदा अर्थमंत्री म्हणून त्यांना संधी मिळाली तेव्हाही त्यांनी गीतेला साक्षी ठेवून शपथ घेतली होती. वंशाविषयी आणि धर्माविषयी सुनक यांना अभिमान आहे. धर्म आणि वंशाबद्दल सुनक यांनी म्हटलंय की..


ऋषी सुनक काय म्हणाले?
मी आता ब्रिटीश नागरिक आहे. मात्र माझा धर्म हिंदू आहे. माझा धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा भारतीय आहे. मी अभिमानाने सांगतो की मी हिंदू आहे आणि माझी ओळखही हिंदूच आहे. असे गौरवोद्गार सुनक यांनी काढलेत. 


इतकंच नाही तर रिचमंड मतदारसंघातून प्रचार करतानाही त्यांनी मंदिरांना आणि हिंदू कुटुंबांना भेटी दिल्याचे फोटो आहेत. यापूर्वी सुनक यांनी खासदारकी आणि मंत्रिपदाची शपथ भगवद्गीतेवर हात ठेवून घेतली होती. पण आता तर ते थेट पंतप्रधानपदाची शपथ गीतेवर हात ठेवून घेतील. काही दिवसांपूर्वी ब्रिटनमध्ये हिंदू धर्मीय आणि मंदिरांवर काही पाकिस्तानी माथेफिरुंनी हल्ले केले होते. आशा करुयात की सुनक पंतप्रधान झाल्यानंतर अशा हल्ल्यांना आळा बसेल आणि ब्रिटनमध्ये सौहार्दाचं वातावरण निर्माण होईल.