Shocking News : परदेशातील रेस्तराँमध्ये एकाच वेळी एकाच खोलीत 12 भारतीयांचा मृत्यू; खरं कारण खळबळजनक...
Indians Died in Georgia: परदेशात विविध कारणांनी वास्तव्यास असणाऱ्या भारतीयांना हादरा. हे नेमकं काय आणि कसं घडलं? अनेकांच्याच आकलनापलिकडलं...
Indians Died in Georgia: अर्थार्जन, शिक्षण किंवा तत्सम कारणांनी दरवर्षी कैक भारतीय परदेशाची वाट धरतात. काही भारतीय अनेक वर्षांपासून परदेशात वास्तव्यास आहेत. अशा सर्व भारतीयांना एका घटनेमुळं जबर हादरा बसला आहे. प्रत्यक्षात उपलब्ध माहितीनुसार या वृत्तामागील मूळ कारण वेगळं असूनही त्यामुळं सर्वांनाच धक्का बसला आहे. जॉर्जियातील गुडॉरी भागामध्ये एका भारतीय रेस्तराँमध्ये एकाच वेळी 12 भारतीयांचा मृत्यू ओढावल्यानं ही खळबळ माजली आहे.
जॉर्जियातील या घटनेनंतर तिथं असणाऱ्या भारतीय वर्तुळामध्ये चिंता आणि दु:खाची लाट पसरली आहे. माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या वृत्तांनुसार कार्बन मोनॉक्साईडच्या वायूगळतीमुळं हे संकट ओढावलं. भारतीय उच्चोद्योग विभागानं या वृत्ताला दुजोरा दिला.
भारतीयांच्या मृत्यूचं मूळ कारण
जॉर्जियातील अंतर्गत प्रकरण मंत्रालयांच्या वतीनं सुरुवातीच्या तपासाच्या आधारे जाहीर केलेल्या माहितीनुसार कोणाती मृत व्यक्तीच्या शरीरावर कोणत्याही दुखापतीची चिन्हं नाहीयेत. पोलीस तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार या सर्व भारतीयांचा मृत्यू कार्बन मोनॉक्साईड या वायूगळतीमुळं ओढावला.
हेसुद्धा वाचा : छगन भुजबळ अजित पवारांची साथ सोडणार? मंत्रिमंडळातून डच्चू देण्याची नेमकं कारणं काय? समजून घ्या
सदर प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर जॉर्जियातील भारतीय दूतावासाच्या वतीनं दु:ख व्यक्त करण्यात आलं. 'गुडॉरी जॉर्जिया इथं 12 भारतीयांचा मृत्यू ओढावला असून, आम्ही या प्रसंगी मृतांच्या कुटुंबासमवेत आहोत. मृत भारतीयांविषयीची अधिक माहिती मिळवण्यासाठी अधिकारी आणि हा विभाग सातत्यानं स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. या प्रसंगी गरजवंतांना आवश्यक ती सर्व मदत केली जाईल', असं या दूतावासाकडून आश्वस्त करण्यात आलं.
कशी झाली वायूगळती?
प्राथमिक तपासानुसार रेस्तराँच्या दुसऱ्या मजल्यावर बेडरुमपाशीच पॉवर जनरेटर ठेवण्यात आलं होतं. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर हे जनरेटर सुरू करण्यात आलं. जनरेटर सुरू केल्यामुळं त्यापासून तयार झालेला कार्बन मोनॉक्साईड हा वायू बंद खोलीमध्ये जमा झाला आणि त्यामुळं तिथं असणाऱ्या सर्वांचाच गुदमरून मृत्यू ओढावला. मृतांमधील सर्व व्यक्ती भारतीय असल्याच्या माहितीवर जॉर्जियातील यंत्रणांनी सुरुवातीला शिक्कामोर्तब केलं. पुढं मात्र यामधील 11 नागरिक भारतीय असून, एका स्थानिकाचाही यात समावेश असल्याचं सांगण्यात आलं.
रेस्तराँच्या बेडरुममध्ये या कर्मचाऱ्यांचे मृतदेह आढळल्यामुळं जॉर्जिया पोलिसांनी या घटनेनंतर अपराधिक दंडसंहितेअन्वये कलम 116 अंतर्गत बेजबाबदारपणामुळं हत्येप्रकरणी गुन्हा दाखल केला.