मुंबई : कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनचा अनेक कंपन्यांवर फरक पडत आहे. नुकतीच अमेरिका आणि जगातील सर्वात मोठी जिम कंपनी Gold Gym ने या काळात आपलं दिवाळ निघाल्याच घोषित केलं. यानंतर आता जगातील सर्वात मोठी कॅब सर्व्हिस कंपनी उबर (Uber)वर देखील संकट कोसळलं आहे. कंपनीने जाहिर केलं आहे की, आर्थिक संकटामुळे अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढावं लागेल. 


३७००कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगभरात लॉकडाऊनमुळे ट्रान्सपोर्ट आणि कॅब सर्व्हिसचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. यूएस सिक्युरिटीज ऍण्ड एक्सचेंज कमीशन (एसईसी) ने उबेर द्वारा घोषित केलेलल्या वक्तव्यामध्ये म्हटलंय की,'कोरोना व्हायरस या महामारीमुळे उत्पन्नात खूप अनिश्चितता आली असून याचा परिणाम व्यवसायावर होत आहे. यामुळे कंपनीने काही खर्च कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.'


उबरने म्हटलं आहे की, राइड्स सेगमेंटमध्ये कमी ट्रिप वॉल्यूम आणि हायरिंग फ्रीजमुळे उबर आपल्या कस्टमर सपोर्ट आणि रिक्रुटर्स टीमला कमी करणार आहे.  कंपनीने आपल्या कस्टमर सपोर्ट आणि रिक्रुटर्स टीमला कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. याकरता कंपनीने ३ हजार ७०० फूल टाइम कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं आहे.  


अमेरिकेतील कंपन्यांनी एप्रिल महिन्यात २ करोडहून अधिक लोकांना कामावरून काढलं आहे. अमेरिकेत एप्रिल महिना हा सर्वात खराब महिना ठरला. एप्रिल महिन्यात २.१८ करोड नोकऱ्या गेल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. अमेरिकेत कोरोना व्हायरसमुळे कार्यालये, कारखाने, शाळा, स्टोर सगळ्याच गोष्टी बंद आहेत. याचा परिणाम अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे.