मॉस्को : तुम्ही सौदी अरेबच्या राजाच्या राजेशाही जीवनशैलीविषयी ऐकले असेल. त्यांच्याकडे जगभरातील सर्व सुखसोयी आहेत. सौदी राजाच्या जीवनशैलीशी संबंधित वृत्त माध्यमांमध्ये सतत येत असतात. सध्या सौदी किंग सलमान बिन अब्दुल अझीझ चार दिवसाच्या मॉस्को दौऱ्यावर आहेत. या भेटी दरम्यान, त्यांच्या सोईसाठी विशेष काळजी घेतली जात आहे. तरीही यावेळी एक गोंधळ निर्माण झाला आणि सौदी किंग अस्वस्थ झाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या खाजगी विमानातून मॉस्को येथे पोहोचणार्या सौदी किंगला एक विचित्र समस्येला सामोरे जावे लागले. त्यामूळे जगभरात या विषयाला घेऊन खिल्ली उडविली जात आहे. यापूर्वी त्यांच्या शाही प्रवासावरील खर्च ६४० कोटी रुपये होता. यावरुन त्यांचा राजेशाही थाट आपल्या लक्षात येईल.  राजा सलमान अलीकडे मॉस्को येथे एका ऐतिहासिक भेटीसाठी आले होते. जेव्हा ते खासगी विमानाच्या दारापाशी आले तेव्हा त्यांच्या समोर एक मोठा पेच निर्माण झाला.


ते जंबो विमानाद्वारे मॉस्को येथे पोहोचले. सौराष्ट्रच्या विमानात उतरण्यासाठी राजाला उतरण्यासाठी सोन्याच्या पायऱ्या बसविण्यात आल्या होत्या.पण राजा या पायऱ्यांवरुन खाली येत असतानाच त्या पायऱ्यांमध्ये बिघाड आला. तेथे उपस्थित असलेल्यांनी या घटनेचा व्हिडिओ बनविला आणि तो व्हायरल झाला.



व्हिडिओत स्पष्टपणे दिसते की सौदी किंगचे सहकारी प्रथम एस्केलेटरवरून खाली उतरतात. पण सलमान बिन अब्दुल अजीझ एस्केलेटरवर पाय ठेवतात आणि थोड्या वेळाने यात बिघाड येतो. राजा थोडावेळ वाट पाहत होता, परंतु एस्केलेटर सुरू न झाल्याने त्यांना पायी चालत जाणे भाग पडले. ८१ वर्षांचे राजा या वेळी गोंधळलेल्या अवस्थेत व्हिडिओमध्ये पूर्णपणे दिसत आहेत. राजाशेजारी उपस्थित असलेले लोकही हे पाहून खजिल झाले.चार दिवसांच्या प्रवासात राजासोबत दीड हजार लोकांचा ताफा आहे.