महिला पडली चिंपांझीच्या प्रेमात, प्राणिसंग्राहलायात महिलेला बंदी!
मात्र जेव्हा एका महिलेने दावा करते की ती खरोखर एका प्राण्याची प्रियसी आहे तेव्हा...
ज्ञानदेव वाघुंडे, बेल्जियम : मानवासाठी प्राणी प्रेमी असणे ही गोष्ट काही नवीन नाही. मात्र जेव्हा एका महिलेने दावा करते की ती खरोखर एका प्राण्याची प्रियसी आहे तेव्हा सर्वांना धक्काच बसला. बेल्जियमध्ये एका महिलेला अँटवर्प प्राणिसंग्रहालयात बंदी घालण्यात आली आहे. कारण अधिकाऱ्यांच्या लक्षात आले की, ती एका विशिष्ट चिंपांझीसोबत जास्त वेळ घालवत आहे. दरम्यान, तरूणीनेही मान्य केलं की, ती या चिंपांझीसोबत खूप वेळ घालवत होते. कारण तिचे तिच्याशी 'अफेअर' आहे.
एडी टिमर्मन्स असं या महिलेचं नाव आहे. दर आठवड्याला एडी प्राणिसंग्रहालयाला भेट द्यायची. आणि चिता नावाच्या 38 वर्षीय चिंपांझीशी संभाषण करत करायची. दोघे एकमेकांवर चुंबन ओवाळताना आणि उडवताना काचेच्या भिंतीच्या विरुद्ध बाजूंनी संवाद साधत असत. चार वर्षांपासून त्यांच्या भेटी सुरू होत्या. ही बाब प्राणिसंग्राहलायाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या महिलेवर संग्राहलायात येण्यासाठी बंदी घातली आहे.
यावर एडीनं अक्षेप नोंदवला आहे. की, माझे त्या चिंपांझीवर प्रेम आहे, तो माझ्यावर प्रेम करतो. माझ्याकडे तेवढेसोडून काहीच नाही. आमचं फक्त अफेअर आहे.
तर प्राणिसंग्राहालयाचा असा विश्वास आहे की, हे प्रेम प्रकरण चितासाठी हानिकारक ठरत आहे. कारण यामुळे इतर चिंपांझींशी संबंध विकसित करण्यासाठी अडथळा ठरत होता. जेव्हा चिता सतत तरूणीसोबत व्यस्त असतो, तेव्हा इतर चिंपांझी त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्याला गटाचा भाग मानत नाही. त्यामुळे चिता भेटीच्या वेळेनंतरही एकटाचं बाजूला बसायचा असं प्राणिसंग्रहालयाच्या निदर्शनास आले.
यावर मात्र चिंपांझी प्रेमींना प्राणिसंग्राहालय अन्याय करत आहे असं वाटतं. कारण या प्राणी संग्रहालयाला अनेक प्राणी प्रेमी भेटी देत असतात. मग एडी टिमर्मन्स का नाही?