आज `या` क्षणापर्यंत जगातील लोकसंख्या कितपत पोहचली?; 2030 पर्यंत आहेत आव्हानं...
मंगळवारी म्हणजेच 15 नोव्हेंबर रोजी जगाची लोकसंख्या (Population) मोठ्या पातळीवर पोहचली आहे.
World Population Reaches to 8 Billion: अकरा वर्षांपुर्वी जेव्हा जगाची लोकसंख्या (World Population) 7 अब्ज झाली जगभरात वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटायला लागल्या होत्या. 2011 साली जगात सात अब्ज लोकसंख्या झाल्यानंतर येत्या काही वर्षात आपण 9 अब्जापर्यंत (Population Hike) उंची मारू शकतो असे निरिक्षण तज्ञांनी नोंदवले होते. आता आपण त्याच वाटेवर जातो आहोत. लोकसंख्या आणि आपल्या देशाच्या तसेच जगाच्या इकोनॉमीवर (World Economy) परिणाम होत असतो. ज्या प्रमाणे लोकसंख्या वाढ होते त्याप्रमाणे त्या त्या भागाची अर्थव्यवस्था (Economy and Challenges) बदलते. मागणी आणि पुरवठ्याच्या हिशोबानुसार महागाई (Inflation) आणि तुडवड्याचा मोठा फरक जाणवू लागतो. दर दहा वर्षांनी जगाची लोकसंख्या मोजली जाते. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या 2021 सालाप्रमाणे आपली लोकसंख्या गणना झाली आहे आणि आजच्या घडीला आपली लोकसंख्या तब्बल 1 अब्जाच्या फरकानं वाढला आहे. (world population reaches to 8 billion see human life expectancy)
मंगळवारी म्हणजेच 15 नोव्हेंबर रोजी जगाची लोकसंख्या (Population) मोठ्या पातळीवर पोहचली आहे. मंगळवारी जगाची लोकसंख्या 8 अब्जांवर पोहोचेली असल्याचा दावा संयुक्त राष्ट्रांच्या (United Nations) अहवालात सादर करण्यात आला आहे. 2030 पर्यंत पृथ्वीवरील लोकसंख्येचा 'हा' आकडा 850 कोटी म्हणजेच जवळपास 8.5 बिलियन, 2050 पर्यंत 970 कोटी म्हणजेच 9.7 बिलियन आणि 2100 पर्यंत 1040 कोटीपर्यंत म्हणजेच जवळपास 10.40 बिलियन पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.
जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त सोमवारी प्रसिद्ध झालेल्या वार्षिक जागतिक लोकसंख्या संभावित अहवालात असेही म्हटले आहे की, जागतिक लोकसंख्या 1950 नंतर सर्वात कमी वेगाने वाढते आहे. 2020 मध्ये लॉकडाऊन आलं होतं. तेव्हा चमत्कारिक पद्धतीनं मृत्यूदाराच्या सोबतच जन्मदर जात होता. किंबहूना त्यानंतर थोड्याफार प्रमाणात जन्मदरही वाढला आहे. परंतु 2020 मध्ये हा वेग एक टक्क्यांहून कमी झाला असं या अहवालात सांगितले आहे.
हेही वाचा - Maharashtra : राज्यात येथे सापडलाय सोन्याचा खजिना, यातून झाला मोठा उलगडा
जागतिक लोकसंख्या 7 वरुन 8 अब्जांपर्यंत पोहोचण्यासाठी 12 वर्षे लागली तर आता 8 वरुन 9 अब्जांपर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे 15 वर्षे लागतील. तेव्हा जगाची लोकसंख्या 2037 पर्यंत 9 अब्जांपर्यंत पोहोचू शकेल. जागतिक लोकसंख्या वाढीचा दर कमी होत आहे. 2022 मध्ये आशियातील दोन सर्वाधिक लोकसंख्येचे प्रदेश पूर्व आणि दक्षिण-पूर्व आशिया आहेत. येथील लोकसंख्या 2.3 अब्ज आहे. मध्य आणि दक्षिण आशियामध्ये 2.1 अब्ज लोकसंख्या आहे. 1.4 अब्ज पेक्षा जास्त लोकसंख्या असलेले चीन आणि भारत हे देश आहेत.
काय म्हणतो UN चा अहवाल?
UN च्या अहवालात (UN Report on population) मानवाच्या सरासरी वयाबद्दलही दावा करण्यात आला आहे. सध्या हे वय 72.8 वर्षे आहे. म्हणजेच आजची जिवंत माणसं ही 72 वयापर्यंत जगत आहेत. जास्तीत जास्त हे वय 73-75 किंवा त्याच्याही वर असू शकते. 1990 च्या तुलनेत 2019 मध्ये हेच वय नऊ वर्षांनी वाढले आहे. म्हणजेच जर 1990 मध्ये ते 61 असेल तर आता ते 72 आहे. जी एक म्हटलं तर सकारात्मक बाब आहे. 2050 मध्ये एका व्यक्तीचं सरासरी आयुष्य हे 77.2 पर्यंत वाढण्याचा अंदाज लावला गेला आहे. या अहवालात असेही म्हटले आहे की, महिला पुरुषांच्या तुलनेत जवळपास 5.4 वर्षे जास्त जगतात. महिलांचे सरासरी वय हे 73.4 वर्षे आणि पुरुषांचे सरासरी वय हे 68.4 वर्षे नोंदवण्यात आले आहे.
हेही वाचा - पुण्याच्या तरूणीने स्वत:च्याच अपहरणाचा रचला डाव, कारण एकूण धक्काच बसेल
2023 पर्यंत काय आहेत आव्हानं?
यापुढे लोकसंख्या वाढीमुळे रिसोर्सेस म्हणजे संसाधनांचा तुटवडा वाढू शकतो. महागाईचे परिणामही भोगावे लागू शकतात. किंबहूना शिक्षण, आरोग्य, सेवा, पर्यावरण यांना अबाधित ठेवण्यासाठी मानवी जीवनात अनेक अडथळेही येण्याची शक्यता आहे.