नसिरुद्दीन शहांच्या पोस्टनंतर विराटच्या चाहत्यांनी काय केले पाहा...

 नसिरुद्दीन यांनी विराट कोहली जगातील अत्यंत वाईट वर्तणूक असलेला खेळाडू आहे, असे म्हटले आहे.

Updated: Dec 18, 2018, 03:10 PM IST
नसिरुद्दीन शहांच्या पोस्टनंतर विराटच्या चाहत्यांनी काय केले पाहा...  title=

मुंबई: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली नहमी चर्चेत असतो. कोहली याला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता आहे. काही लोकांना विराटची खेळी बघायला आवडते, तसेच कोहलीचे ते मनापासून कौतुकही करतात. पण त्याचबरोबर त्याच्या वागणुकीत थोडा बदल झाला पाहिजे, अशी अपेक्षादेखील ठेवतात. बॅालिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शहा यांच्याकडून अशाचप्रकारे ट्विट करण्यात आले आहे. नसिरुद्दीन यांनी विराट कोहली जगातील अत्यंत वाईट वर्तणूक असलेला खेळाडू आहे, असे म्हटले आहे.
 
"विराट एक उत्तम खेळाडू आहे. पण त्याच्या वर्तणुकीच्या बाबतीत बोलायचे झाल्यास तो उर्मट आहे. चाहत्यांकडून भरभराटीने मिळणाऱ्या लोकप्रियतेमुळे त्याच्या मैदानातील गैरवर्तणुकीकडे दुर्लक्ष केले जाते", असे नसिरुद्दीन शहा यांनी म्हटले आहे. 

याआधी विराट कोहलीने ट्विटरच्या माध्यमातून एका प्रेक्षकाला देश सोडण्याचा सल्ला दिला होता. यासोबतच नसिरुद्दीन शहा यांनी मी काही देश सोडणार नाही, असा टोमणाही विराटला  मारला. नसिरुद्दीन यांनी केलेल्या ट्विटमुळे क्रिकेटप्रेमीमध्ये संतापजनक वातावरण निर्माण झाले आहे. तसेच विराटच्या चाहत्यांनी शहा यांच्या पोस्टवर टीका करुन नाराजी व्यक्त केली.