डाक विभागात नोकरीची संधी, इथे करा अर्ज

इच्छुक आणि पात्र उमेदवार ७ सप्टेंबर २०१८ पर्यंत अर्ज करु शकतात.

Updated: Jul 27, 2018, 09:30 AM IST
डाक विभागात नोकरीची संधी, इथे करा अर्ज

मुंबई : जर तुम्ही डाग विभागात काम करु इच्छित असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे.  यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार ७ सप्टेंबर २०१८ पर्यंत अर्ज करु शकतात. 7th Pay Commission Pay नुसार स्टाफ कार ड्राइव्हर पदासाठी ही भरती आहे. पे स्केल- स्टाफ कार ड्रायव्हरला 7th Pay Commission नुसार पगार मिळणार आहे. पे बॅंड १९,९०० पासून ६३,००० पर्यंत असणार आहे. लेखी परीक्षा आणि थेट मुलाखतीतून ही निवड केली जाणार आहे. उमेदवारांचे वय ५६ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

कोण करु शकेल अर्ज 

नियमित डिस्पॅच रायटर (ग्रुप सी) आणि ग्रुप सी कर्मचाऱ्यांसाठी वेतन ब्रॅंड-१, ५२००-२०,२०० रुपये ६०० सीपीसी नुसार १८०० रुपये (७ वे आयोग वेतन मॅट्रीक्स अनुसार स्तर १) असणार आहे. ज्यांच्याकडे लाइट आणि जड वाहन चालविण्याचे अधिकृत ड्रायविंग असेल ते यासाठी अर्ज करु शकतात. 

सशस्त्र दल कर्मचारी

सशस्त्र दलातील कर्मचारी जे रिटायर होण्याच्या मार्गावर आहेत तेदेखील इथे अर्ज करू शकता. यासाठी पदासाठी आवश्यक अनुभव आणि योग्यता यांचा विचार केला जाणार आहे. अशा उमेदवारांना सशस्त्र दलाकडुन डेप्युटेशनसाठी अटी दिल्या जाणार आहेत. त्यानंतरच ते नोकरी करु शकतात. 

पद

स्टाफ कार ड्रायव्हर 

पद संख्या

९ पद रिक्त 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close