दहावीची परीक्षा न घेण्यावर सरकार ठाम, शिक्षणमंत्री आज महाधिवक्तांशी करणार चर्चा

कोरोना काळात दहावीची परीक्षा (SSC Exam) न घेण्यावर राज्यातील महाविकास आघाडी सरकार ( Maharashtra Government) ठाम आहे.  

Updated: May 24, 2021, 01:00 PM IST
दहावीची परीक्षा न घेण्यावर सरकार ठाम, शिक्षणमंत्री आज महाधिवक्तांशी करणार चर्चा title=

मुंबई : कोरोनाचा (Coronavirus) हाहाकार दिसून येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. अनेक ठिकाणी ग्रामीण भागात कोरोनाची स्थिती चिंताजनक आहे. कोरोना काळात दहावीची परीक्षा (SSC Exam) न घेण्यावर राज्यातील महाविकास आघाडी सरकार ( Maharashtra Government) ठाम आहे. दहावीची परीक्षा घेण्याबात मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) सरकारकडे स्पष्टीकरण मागितले होते. परीक्षा न घेण्यावर न्यायालयाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले होते. असे असूनही सरकार आपल्या निर्णयावर ठाम राहिले आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार याची उत्सुकता आहे. आज शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या महाधिवक्तांशी चर्चा करणार आहे. त्यानंतर दहावी परीक्षेबाबत (10th board exam) राज्य सरकार न्यायालयात आपली बाजू मांडणार आहे.

दरम्यान, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांनी काल 10 वीची परीक्षा न घेण्याचे संकेत दिले होते. मात्र, परीक्षा न घेता मुलांना पास करण्याबाबत विचारविनिमय करण्यात येणार आहे. त्यासाठी आज म्यूल्यमापनाबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर राज्य सरकार आपली बाजू मांडणार आहे. उच्च न्यायालयात सरकारची बाजू टिकणार का, याची उत्सुकता आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कोरोना काळात परीक्षा घेऊ नये, अशी काही पालकांची मागणी आहे. तसेच सरकारचाही या परीक्षा घेण्यात येऊ नये, निर्णय आहे. त्यामुळे पुढे काय होणार याकडे लक्ष लागले आहे.

रविवारी केंद्रीय मंत्रिमंडळासोबत झालेल्या बैठकीत, राज्यातील कोरोना परिस्थिती आणि मुलांची मानसिक तयारी याबाबत मंत्री वर्षा गायकवाड यांनी अवगत केले होते. राज्य सरकार कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी तयारी करीत आहे. ही लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचे सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे धोकादायक ठरु शकते, असे सूचित करण्यात आले. त्यानंतर आज शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad)या महाअधिवक्तांशी चर्चा करणार आहे. या चर्चेनंतर पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. कोणताही धोका पत्करायचा नाही, अशी भूमिका राज्य सरकारची दिसून येत आहे. त्यामुळे कोरोना काळात परीक्षा न घेणे योग्य आहे, असे मत राज्य सरकारचे आहे.

दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांचे तातडीने लसीकरण करणे, त्यांना परीक्षेसाठी सुरक्षित वातावरण तयार करणे, मानसिक तयारी असणे गरजेचे आहे, याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे सांगत  शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, मुंबई उच्च न्यायालयाने दहावीच्या परीक्षा घेण्याविषयी विचारणा केली आहे.  राज्य सरकारने दहावीच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत राज्य सरकार न्यायालयात आपली बाजू मांडेल. सध्याची परिस्थिती असाधारण आहे. असाधारण परिस्थितीत असाधारण निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे दहावीच्या परीक्षा न घेण्यावर राज्य सरकार ठाम असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दहावीची परीक्षा घेतली नाही तर पुढे काही समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर अकरावी प्रवेश प्रक्रियाबाबत शिक्षणतज्ज्ञांशी चर्चा सुरु आहे. त्यासाठी आरखडा निश्चित करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. त्यामुळे आता न्यायालयात काय निर्णय होतो, याकडे लक्ष आहे.