निकालाची वाट पाहणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

सरकारची शिक्षक संघटनांच्या मागण्या मान्य करण्यासंदर्भात सकारात्मक पावलं...

Shubhangi Palve Updated: Apr 10, 2018, 10:44 PM IST
निकालाची वाट पाहणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी title=
प्रातिनिधीक छायाचित्र

मु्ंबई : यंदा बारावीचा निकाल वेळेत लागणार आहे. कनिष्ठ महाविद्यालीन शिक्षकांचं आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी रात्री उशिरा शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेत चर्चा झाली. त्यानंतर शिक्षक संघटनांनी हा निर्णय जाहीर केलाय. 

मूल्यांकन झालेल्या कायम विना अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांची यादी आजपासून ऑनलाईन जाहीर करण्याचा निर्णय झाला. संघटनेच्या इतर मागण्यांच्या बाबतही निर्णय झाले असून शासनानं तसं पत्रही दिलं आहे. 

सरकारनं मागण्या मान्य करण्यासंदर्भात सकारात्मक पावलं उचलल्यानं, आजपासून मॉडरेटर्स तपासलेल्या उत्तरपत्रिका बोर्डात जमा करणार आहेत. त्यामुळे बारावीचा निकाल वेळावर लागण्याचा मार्ग मोकळा झालाय.